लातूर – तरुणींनी आत्मभान जागृत ठेवून जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात उत्तुंग भरारी घ्यावी असे प्रतिपादन शैलजा वारद यांनी केले .त्या येथील महात्मा बसवेश्वर महाविद्यालयात आयोजित शारदीय नवरात्र महोत्सवात उद्घाटक म्हणून बोलत होत्या.
या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ.संजय गवई हे होते तर विचारमंचावर कनिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा. संजय पवार ,पर्यवेक्षिका प्रा. वनिता पाटील ,राजनंदा कनिष्ठ महाविद्यालयाच्या प्राचार्या सुष्मिता पाटील, युवती मंचाच्या अध्यक्षा डॉ शीतल येरूळे ,सांस्कृतिक विभाग प्रमुख डॉ. रत्नाकर बेडगे आदींची उपस्थिती होती. कार्यक्रमाचे प्रारंभी जगतज्योती महात्मा बसवेश्वरांच्या प्रतिमेचे पूजन आणि दीप प्रज्वलन झाले.
पुढे बोलताना शैलजा वारद म्हणाल्या की ,आदिशक्तीची उपासना म्हणजे धैर्य ,शक्ती निर्णय क्षमता, सदसद विवेकाची जागृती याकरिता केली जाते तरुणींनी नवरात्रात नवरंगी जीवन जगत सकारात्मक ऊर्जा निर्माण करून समाजासाठी, देशासाठी विधायक कार्य करण्याचा प्रयत्न करावा असेही त्या म्हणाल्या.
कार्यक्रमाच्या प्रमुख अतिथी सुष्मिता पाटील म्हणाल्या की,
तरुणींनी स्वतंत्र, स्वावलंबी, जबाबदारीपूर्ण असे जीवन जगणे आदिशक्तीच्या उपासनेतून शिकली पाहिजे. आज जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात स्त्रियांनी भरीव अशी कामगिरी केली आहे त्यांच्या कार्याचे स्मरण करून आपणच आपल्या जीवनाचे शिल्पकार समजून जीवन समृद्ध केले पाहिजे असेही त्या म्हणाल्या.
आपल्या अध्यक्षीय समारोपात डॉ. संजय गवई म्हणाले की, उत्सव हे मानवी जीवनात चैतन्य निर्माण करणारे असतात. या निमित्ताने लोकशक्ती एकत्र होऊन समाजामध्ये एकत्वाची भावना निर्माण होते असेही ते म्हणाले.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक पर्यवेक्षिका प्रा.वनिता पाटील यांनी केले. सूत्रसंचालन प्रा. कल्पना गिराम, प्रा. रूपाली हलवाई यांनी केले तर आभार डॉ. अश्विनी रोडे यांनी मानले .
कार्यक्रमाचे औचित्य साधून उत्तम सादरीकरण करणाऱ्या
अमृता डांगे, उमा पवार, संजना पारडे, कदम वैष्णवी, सायली कांबळे, स्नेहल मिसाळ, शेख अफसिन, पूजा कांबळे या विद्यार्थिनी व विजेत्या संघांना जगज्योती महात्मा बसवेश्वरांचे प्रतिमा देऊन सन्मानित करण्यात आले.
या कार्यक्रमाच्या यशस्वीते करिता प्रा. माधुरी सरपे, वाणिज्य विभाग समन्वयिका प्रा. वैशाली जयशेट्टे, प्रा. विष्णू ततापुरे ,रमेश राठोड , आनंद खोपे, राजू बोडके ,संतोष राठोड यांनी परिश्रम घेतले.


