लातूर : अवंती नगरातील डी.एम. ज्युनिअर कॉलेज लातूरचा महाराष्ट्र माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने घेण्यात आलेल्या 12 वी बोर्ड परीक्षेत कला, वाणिज्य व विज्ञान शाखेचा निकाल 100% लागला असून दरवर्षीप्रमाणे या ही वर्षी कॉलेजची यशाची परंपरा कायम राहिली आहे.
कॉलेजमधील विज्ञान शाखेचा निकाल 100% लागला असून विज्ञान शाखेतून सर्वप्रथम राजुळे स्वयम (85%) द्वितीय शेख तुबतज्जिन (81%) तर तृतीय कोव्हाळे गौरव (77%) तर वाणिज्य शाखेचा 90% निकाल लागला असून वाणिज्य शाखेतून सर्वप्रथम भोसले संतोष (80%), द्वितीय दरेकर साक्षी (76%), तृतीय सुनके नेहा (72%) व कला शाखेचा निकाल 75% लागला असून कला शाखेतून सर्वप्रथम वाकळे प्रगती (64%), द्वितीय साळुंके पूनम (61%), आणि आरेराव सुनाक्षी (58%) व करदुरे प्रिती (58%) यांनी तृतीय क्रमांक प्राप्त केला आहे.
कॉलेज मधील सर्व यशस्वी व गुणवंत विध्यार्थ्यांचे अभिनंदन संस्थासचिव कालिदास माने, संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मनोज माने, प्रशासकीय अधिकारी जी. टी. माने, विलासराव देशमुख कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्या विवेक माने, साने गुरुजी शैक्षणिक संकुलातील सर्व प्राचार्य व मुख्याध्यापक, शिक्षकवृंद, शिक्षकेत्तर कर्मचारी व डी. एम. कॉलेजचे प्राचार्य चव्हाण एस.एस. यांनी केले तसेच कॉलेज मधील सर्व प्राध्यापक सूर्यवंशी ए.डी. थोरात व्ही. एस., कांबळे एस.व्ही., बुरशे बी.एस., भोसले व्ही.ए., माळी बी. के., बोधणे एस.बी., शेख एस.ए., माने एस.बी., बामणकर पी.सी., आणि शिक्षकेत्तर कर्मचारी पवार डी. के. जाधव एस.एम., जाधव डी.जे., पांचाळ दिग्विजय, सुडे आर.पी., हेडे ए.एस. यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक केले.