लातूर – लातूर ज्येष्ठ नागरिक संघाचे सचिव महाराष्ट्र ज्येष्ठ नागरिक महासंघ फेसकॉमचे अधिवेशने प्रमुख प्रकाश घादगिने यांची लातूर जिल्ह्यातील ज्येष्ठ नागरिक संघाच्या समन्वयकपदी निवड झाली. निवडीचे पत्र मराठवाडा प्रादेशिक विभाग दक्षिण फेसकॉम बीड च्या अध्यक्षांनी त्यांना सुपूर्द केले आहे. प्रकाश घादगिने यांनी ज्येठांसाठी केलेल्या कार्याची दखल घेऊन ही निवड करण्यात आल्याचे यावेळी सांगण्यात आले. या निवडीबद्दल डॉक्टर बी. आर,पाटील समन्वयक महाराष्ट्र अण्णासाहेब टेकाळे अध्यक्ष महाराष्ट्र .दामोदर थोरात अध्यक्ष दक्षिण मराठवाडा विभाग बीड, जगदीश जाजू सचिव दक्षिण मराठवाडा विभाग बीड, अभियंता आर.बी. जोशी अध्यक्ष ज्येष्ठ नागरिक संघ डॉक्टर काशिनाथ सलगर, वसंत बेंडे, शहाजी गाडगे, प्रकाश नीला, रमेश भोयरेकर, डॉक्टर भास्कर बोरगावकर, डॉक्टर मायाताई कुलकर्णी व शाकुंतला यादव यांनी स्वागत केले.
