लातूर – ज्येष्ठ नागरिक संघ लातूर तर्फे जेष्ठ नागरिक संघातील सभासदांचा अमृत महोत्सव ,सहस्त्रचंद्रदर्शन व जीवनगौरव पुरस्कारा चे आयोजन करण्यात आले होते स्वागत गीत देवी कुमार पाठक यांनी गायले कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रकाश घादगिने व अभियंता आर.बी .जोशी यांनी केले हा कार्यक्रम हॉटेल गायत्री उत्सव येथे साजरा करण्यात आला कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माननीय दामोदर थोरात अध्यक्ष दक्षिण मराठवाडा विभाग अंबाजोगाई तर प्रमुख पाहुणे माननीय अविनाश देवशटवार प्रादेशिक उप आयुक्त समाज कल्याण विभाग व माननीय विक्रांत गोजमगुडे माजी महापौर लातूर या मान्यवरांच्या हस्ते सोहळा साजरा करण्यात आला अमृत महोत्सवात श्री रामानुज रांदड, डॉक्टर बी .आर .पाटील ,राजीव नाईक .सहस्त्रचंद्र दर्शनात अशोक गोस्वामी, नाना पाटील,डॉक्टर पांडे आंबेकर, दर्डा पुकराज,देशपांडे वसंतराव, देशमाने गौतमचंद, तर प्रभाकरराव गणपतराव उदगीरकर यांना जीवन गौरव पुरस्काराने मान्यवरांनी सन्मानित केले.सर्व सत्कारार्थी यांचे कुटुंबीय व मित्रपरिवार या कार्यक्रमात सहभागी होते सत्काराला उत्तर म्हणून रामानुज रादंड डॉक्टर बी. आर. पाटील, व प्रभाकरराव उदगीरकर यांनी मनोगते व्यक्त केली अविनाश देवशटवार यांनी ज्येष्ठांसाठी काम करायला आवडते त्यांच्यात रमान व्हावे वाटते व ज्येष्ठांच्या साठी आम्ही कटिबद्ध असल्याचे सांगितले. विक्रांत गोजमगुडे यांनी सुद्धा ज्येष्ठान विषयी आपुलकी, प्रेम,व त्यांची सेवा हीच ईश्वर सेवा समजतो ज्येष्ठांच्या अनुभवाची शिदोरी आम्हाला पुरेशी आहे त्यांच्याच मार्गदर्शनाने आम्ही मोठे झालोत असे गौरोदगार काढले डॉक्टर दामोदर थोरात सरांनी अध्यक्षीय भाषणात जेष्ठान साठी कार्यक्रम होतात पण असा आगळावेगळा,भव्य दिव्य, नेत्र दीपक कार्यक्रम मी प्रथमच लातूर नगरीत पाहतो म्हणाले संघाचे कार्यकर्त्यांचे त्यांनी तोंड भरून कौतुक केले कार्यक्रमास आलेले सर्व ज्येष्ठ नागरिक महिला भारावून गेले कार्यक्रम यशस्वी करण्याकरता अभियंता आर.बी.जोशी डॉक्टर काशिनाथराव सलगर,शहाजी घाडगे,वसंत बेडे , प्रकाश निला, रमेश भोयरेकर आदींनी परिश्रम घेतले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रसिद्ध कवयित्री शैलजा कारंडे यांनी केले तर आभार प्रदर्शन वसंत बेंडे यांनी मानले.
