https://youtu.be/oy8TpmqyKX8
जेष्ठांचा अमृत महोत्सव, जीवनगौरव पुरस्कार वितरण सोहळा संपन्न
लातूर – ज्येष्ठ नागरिक संघाच्या वतीने ज्येष्ठांचा अमृत महोत्सव सहस्त्रचंद्रदर्शन व जीवनगौरव पुरस्कार वितरण सोहळा पार पडला. बुधवार 20 डिसेंबर रोजी खोरी गल्ली येथील वेद प्रतिष्ठान सार्वजनिक वाचनालयाच्या सभागृहामध्ये हा कार्यक्रम पार पडला. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा माहिती अधिकारी युवराज पाटील व ज्येष्ठ नागरिक संघाचे दक्षिण मराठवाडा उपाध्यक्ष दामोदर थोरात यांची उपस्थिती होती.
कार्यक्रमामध्ये मलिकार्जुन कानडे, डॉ. बंड्या स्वामी, रमेश रामढवे, प्रा. रविंद हिंगमिरे, डॉ. रमाकांत पाटील, व्यंकटराव ढगे, देवीकुमार पाठक, माया कुलकर्णी, आनंद कुलकर्णी भागवत भंदे, सरिता मंत्री, छाया जोशी व बाबामियाँ पटेल यांचा सत्कार सोहळा यावेळी पार पडला. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी ज्येष्ठ नागरिक संघाचे उपाध्यक्ष डॉ काशिनाथ सलगर सहसचिव शहाजी घाडगे कोषाध्यक्ष वसंत बेंडे सदस्य प्रकाश निला रमेश भोयरेकर भास्कर बोरगावकर शकुंतला यादव यांनी परिश्रम घेतले कार्यक्रमाची प्रास्ताविक ज्येष्ठ नागरिक संघाचे सचिव प्रकाश घाटगे यांनी केले तसेच आभार ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष आर. बी. जोशी यांनी मांनले

