पाच म्हशीही दगावल्या…
चाकुर तालुका
महाळंगी येथे आज अंदाजे दुपारी चार वाजता वीज पडून शिवाजी नारायण गोमचाळे अंदाजे वय 35 वर्षे व ओम लक्ष्मण शिंदे अंदाजे वय 30 वर्षे याचा मृत्यू झाला आहे
मौजे शिवनखेड येथील प्रभू रामा कोपले यांची म्हैस झाडाखाली बांधली असता वीज कोसळून मयत झाली आहे.
निलंगा तालुका
पानचिंचोली येथील बळीराम व्यंकट हणमंते वय 35 यांच्या अंगावर आंब्याचे झाड पडुन ते मयत झाले आहेत त्यांच्या पश्चात पत्नी दोन मुले व वडील आहेत.
शेळगी येथील शेतकरी दत्तात्रय गोविंद रोडे यांची म्हैस विज पडून मयत झाली आहे.
शिरूर अनंतपाळ तालुका
हालकी येथे आज पाच वाजता गंगाधर माधवराव बामनकर यांची एक म्हैस वीज पडून मयत झाली
लातूर तालुका
तांदुळजा येथे वीज पडून ईश्वर सराफ यांची एक म्हैस आणि मौजे काटगाव (कृष्णानगर तांडा) तालुका लातूर येथील विठ्ठल राठोड यांची म्हैस विज पडून मयत झाली आहे.

