लातूर : पोलीस अधीक्षक कार्यालयात ११ ऑक्टोबर रोजी जिल्हास्तरीय महिला दक्षता समितीची बैठक संपन्न झाली.
जिल्हास्तरीय महिला दक्षता समितीचे पदसिध्द अध्यक्ष हे पोलीस अधीक्षक लातूर व पदसिद्ध सचिव म्हणून पोलीस उप अधीक्षक पोलीस मुख्यालय लातूर हे असून समितीत इतर १३ महिला सदस्यांची नियुक्ती करण्यात आली. समितीच्या माध्यमातून महिला सुरक्षितता व उपाययोजना या संदर्भात पोलीस विभागाशी समन्वय ठेवून आवश्यक ते बदल व सूचना करणे हा आहे.
महिला दक्षता समितीच्या बैठकीस अध्यक्ष म्हणून पोलीस अधीक्षक सोमय मुंडे, अपर पोलीस अधीक्षक डॉ. अजय देवरे, सचिव पोलीस उप अधीक्षक गजानन भातलवंडे हे उपस्थित होते.
बैठकीस उपस्थित समिती सदस्यांनी विविध विषयावर स्वतःचे मनोगत व्यक्त करून महिला सुरक्षितते संबंधी काही सूचना यावेळी केल्या. महिला सदस्यांशी पोलीस अधीक्षक सोमय मुंडे व अपर पोलीस अधीक्षक डॉ अजय देवरे यांनी प्रश्न-उत्तर स्वरूपात संवाद साधला व सदस्यांनी सुचविलेल्या मुद्द्यांवर तात्काळ अंमलबजावणी करण्याची हमी दिली.
यापुढे महिला दक्षता समितीची पोलीस स्टेशन स्तरावर प्रत्येक महिन्याच्या पहिल्या आठवड्यात व जिल्हास्तरीय बैठक प्रत्येक ३ महिन्याला घेण्याचे पोलीस अधीक्षक यांनी जाहीर केले.
सदर बैठकीस समितीच्या सदस्या सुजाता माने, आम्रपाली देशमुख, सरोज पवार, जयश्री ठवळे, योजना कामेगावकर, अश्विनी मंदे, मीना गायकवाड, स्वाती तोडकरी, समाधानताई माने, अर्चनाताई पाटील, सारिका भोसले, अनिता मुदगुले, रेखा साळवे, सुलेखा शिंदे व इतर एकूण ३० ते ३५ महिला सदस्य उपस्थित होत्या.
बैठकीचे सूत्रसंचालन सुजाता माने यांनी, प्रस्तावना दयानंद पाटील, सहाय्यक पोलीस निरीक्षक यांनी तर आभार पोलीस उप अधीक्षक गजानन भातलवंडे यांनी मांडले. सदर बैठक पार पडण्यासाठी भरोसा सेल येथील पोलिस अमलदार राजाभाऊ सूर्यवंशी, महिला पोलीस अंमलदार मीरा सोळुंके, कविता मुळे, राजश्री हेंगणे, अंबिका घनगावे, प्रतिभा हिंगे, सुजाता चिखलीकर, भाग्यश्री भुसे, पल्लवी चिलघर यांनी परिश्रम घेतले.
