20.3 C
New York
Sunday, July 6, 2025

जिल्हास्तरीय दिव्यांग मुला-मुलींच्या क्रीडा स्पर्धा संपन्न

लातूर : जागतीक दिव्यांग दिनानिमीत्त बाभळगाव येथील पोलीस मुख्यालयाच्या मैदानावर झालेल्या दिव्यांग मुला-मुलींच्या क्रीडा स्पर्धेतील विजेत्या, उपविजेत्या संघाना मान्यवरांच्या हस्ते ट्रॉफी देवून सन्मान करण्यात आला. दिव्यांग प्रकरातील पाचही प्रवर्गातील खेळाडूंचा यात समावेश होता.
जिल्हा परिषद समाजकल्याण विभागाच्या वतीने झालेल्या क्रीडा स्पर्धेत मुकबधीर, अंध, अस्थिव्यंग, मतिमंद व बहुविकलांग प्रवर्गातील ६०० खेळाडूंनी यात सहभाग नोंदवीला. अस्थिव्यंग प्रवर्गात सुआश्रय निवासी अपंग विद्यालय लातूरने सांघीक विजेतेपद पटकाविले उपविजेतेपदी अहमदपूरच्या निवासी अपंग विद्यालयाचा संघ राहीला. अंध प्रवर्गात उदगीरच्या एम.ए.बी. अंध विद्यालयाने १३ बक्षीसासह विजेतेपद पटकावीले. उपविजेतेपदी शासकिय अंध विद्यालय लातूर राहीले. मुकबधीर प्रवर्गात सौ. सुशिलादेवी देशमुख निवासी मुर्तीच्या मुकबधीर विद्यालयाने सांघीक विजेतेपद पटकावीले, उपविजेतेपदी १३ मेडलसह  ॲड. विजयगोपाल अग्रवाल मुकबधीर विद्यालयाचा संघ राहीला. मतिमंद प्रवर्गात संत गाडगेबाबा अनाथ मतिमंद मुलांच्या बालगृहाने विजेतेपद पटकावीले, उपविजेतेपदी औराद शहाजनीच्या राजीव गांधी निवासी मतिमंद विद्यालयाने ११ बक्षीसे पटकावत दुसरा क्रमांक मिळविला. बहुविकलांग प्रवर्गात संवेदना सेरेब्रल पाल्सी विकसन केंद्र हरगुळच्या संघाने सांधीक विजेतेपद पटकाविले. विजेत्या खेळाडूंना जिल्हा समाजकल्याण अधिकारी संतोषकुमार नाईकवाडी यांच्या हस्ते ट्रॉफी देवून गौरविण्यात आले. यावेळी वैद्यकिय सामाजिक कार्यकर्ता राजू गायकवाड, सहाय्यक सल्लागार बाळासाहेब वाकडे, यांच्यासह दिव्यांग शाळेतील मुख्याध्यापकांची उपस्थिती होती. स्पर्धेच्या यशस्वीतेसाठी क्रीडा शिक्षक प्रशांत कुलकर्णी, महेश पाळणे, नंदकुमार थडकर, नामदेव भालेकर, तुकाराम शिरसाट, समाजकल्याण विभागाचे अंकुश बिरादार, विक्रम जाधव, शिवराज गायकवाड, अण्णासाहेब कदम, तुकाराम येलमटे, विजयकुमार बुरांडे, राजकुमार पवार, गणेश पाटील, प्रशांत देशमुख यांच्यासह दिव्यांग शाळेतील शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles