लातूर : जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांनी आज शासकीय महिला तंत्रनिकेतन येथील लातूर शहर विधानसभा मतदारसंघाच्या ईव्हीएम सुरक्षा कक्षाची, तसेच लातूर ग्रामीण विधानसभा मतदारसंघाच्या पुरणमल लाहोटी शासकीय तंत्रनिकेतन येथील ईव्हीएम सुरक्षा कक्षाची पाहणी केली.
यावेळी त्यांच्यासोबत उपजिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. भारत कदम, लातूर ग्रामीण विधानसभा मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी संदीप कुलकर्णी, लातूर शहर विधानसभा मतदारसंघाच्या निवडणूक निर्णय अधिकारी रोहिणी नऱ्हे, सहायक निवडणूक निर्णय अधिकारी सौदागर तांदळे, मंजुषा भगत यांच्यासह संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
