जवळगा : देवणी तालुक्यातील जवळगा हे गाव मांजरा नदीपात्रात असलेल्या स्वयंभू रामलिंग मंदिरामुळे सुद्धा प्रसिद्ध आहे. येथे सुरू असलेल्या अखंड शिवनाम सप्ताहाची सांगता सोमवारी मोठ्या उत्साहात झाली. या प्रसंगी श्री शंभूशिवलिंग शिवाचार्य महाराज उपस्थित होते. या शिवनाम सप्ताहाच्या समाप्तीमध्ये जवळगा येथील सेवानिवृत्त शिक्षक शिवाजी धानुरे व परमेश्वर बिरादार तसेच गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. हा सत्कार जवळगा येथील शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष, माजी सरपंच तथा श्री महादेव माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचे प्राचार्य रामलिंग मुळे व सचिव अनिल मुळे यांच्या हस्ते करण्यात आला. या प्रसंगी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. .
