लातूर : राज्यातील शेतकरी विविध समस्यांवर मोर्चा उघडण्यासाठी लातूर जिल्हा काँग्रेस कमिटी च्या वतीने लातूर येथील छत्रपति शिवाजी महाराज चौक येथे ३ मार्च रोजी आंदोलन केले जाणार आहे. या आंदोलनाची तयारी आणि कार्ययोजना ठरवण्यासाठी २८ फेब्रुवारी शुक्रवार रोजी दुपारी काँग्रेस भवन येथे जिल्हातील तालुकास्तरीय नेत्यांची पदाधिकाऱ्यांची बैठक पार पडली. बैठकीत शेतकऱ्यांना रास्त वीजपुरवठा, पीक विमा, कर्जमाफी, कृषि आवजारांवरील जीएसटी ,सोयाबीन संशोधन केंद्र,देवनी वळु संशोधन केंद्र,शेतकऱ्यांचे प्रलंबित असलेले ठिबक अनुदान,सोयाबीन फरक,सोलार पम्प तत्काल देण्यात यावेत
आणि उत्पादनखर्चाच्या आधारे पिकांचे भाव,दूध दरवाढ द्यावी, यासारख्या अन्य विविध मागण्यांवर भर देण्यात आला.
या बैठकीला महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सचिव अभय दादा साळुंके, सहकार विभागाचे जिल्हाध्यक्ष रवि काळे, महिला काँग्रेस अध्यक्ष शीलाताई पाटील, युवक काँग्रेस जिल्हाध्यक्ष प्रवीण बिरादार, सेवादलाचे जिल्हाध्यक्ष अनिल चव्हाण, जिल्हा काँग्रेस चे समन्वयक प्रा. ओमप्रकाश झुरळे,अल्पसंख्यांक विभागाचे जिल्हाध्यक्ष सिराजोद्दीन जहागीरदार, ओबीसी विभागाचे जिल्हाध्यक्ष प्रा. एकनाथ पाटील, रोजगार व स्वयंरोजगार विभागाचे जिल्हाध्यक्ष श्री सिकंदर पटेल, सोशल मीडियाचे जिल्हाध्यक्ष प्रवीण सूर्यवंशी, डॉक्टर विभागाचे जिल्हाध्यक्ष अरविंद भातांब्रे, किसान सेलचे जिल्हाध्यक्ष किशोर टोम्पे,इंटक विभागाचे जिल्हाध्यक्ष श्री राजकुमार कत्ते,एन एस यु आय विभागाचे जिल्हाध्यक्ष रामराजे काळे तसेच लातूर जिल्ह्यातील सर्व तालुकाध्यक्ष विजयकुमार पाटील,दत्तोपंत सूर्यवंशी, सुभाष घोडके, मारुती पांडे,आबासाहेब पाटील, कल्याण पाटील याचबरोबर शहराध्यक्ष महेश धूळशेट्टी,अजित नाईकवाडे, पठाण मंजूरखा, जावेद तांबोळी,पदम पाटील, शेख हुसेन, अमोल चव्हाण, भिसे ज्ञानेश्वर, कमलाकर गायकवाड,नामवाड संग्राम, तसेच सर्व फ्रंटल जिल्हाध्यक्ष ,तालुका अध्यक्ष शहराध्यक्ष पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
