27.4 C
New York
Saturday, July 5, 2025

एमआयटी येथे आ. रमेशआप्पा कराड यांच्या हस्ते ध्वजारोहण

 लातूर दि. १५  भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने माईर्स एमआयटी वैद्यकीय शैक्षणीक संकुल, लातूर येथे गुरुवार १५ ऑगस्ट रोजी सकाळी ९.१५ वाजता लातूर एमआयटीचे कार्यकारी संचालक तथा विधानपरिषदेचे सदस्य आ. रमेशअप्पा कराड यांच्या हस्ते ध्वजारोहन करण्यात आले. याप्रसंगी विविध क्षेत्रात प्राविण्य मिळविलेल्या महाविद्यालयातील विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला.

  प्रारंभी राष्ट्रपिता महात्मा गांधीजी यांच्या प्रतिमेस आ. रमेशअप्पा कराड यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. त्यानंतर मोठ्या उत्साहाच्या आणि राष्ट्रभक्तीच्या वातावरणात ध्वजारोहण करण्यात आले. याप्रसंगी लातूर एमआयटीचे परिसर समन्वयक पृथ्वीराज कराड, वैद्यकीय महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एन. पी. जमादार, उपअधिष्ठाता डॉ. बी. एस. नागोबा, प्रशासकीय व शैक्षणिक संचालिका डॉ. सरिता मंत्री, शैक्षणिक संचालक डॉ. चंद्रकांत शिरोळे यांच्यासह अनेक मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती.

विविध क्षेत्रात गेल्या वर्षभरात प्राविण्य मिळवल्याबद्दल कार्यकारी संचालक आ. रमेशआप्पा कराड यांच्या हस्ते महाविद्यालयातील अध्यापक प्रा. डॉ. अभिजीत रायते, प्रा. डॉ सचिन इंगळे, प्रा. डॉ. महेश उन्नी, वैद्यकीय शिक्षण तृतीय वर्षातील विद्यार्थी प्रजय गिरी, देवांग कुलकर्णी त्याचबरोबर पद्युत्तर विद्यार्थी डॉ. गिरिजा नावंदीकर, डॉ. अक्षय पाटणकर, डॉ. प्रियंका मल्होत्रा, डॉ. आकाश शेट्टी, डॉ. अक्षता माने, डॉ. श्रद्धा शिंदे, डॉ. ऋतुजा काळे, डॉ. श्वेता राठोड, डॉ. श्रुती सारडा यांचा यथोचित सत्कार करून अभिनंदन करण्यात आले. त्याचबरोबर धन्वंतरी वैद्यकीय महाविद्यालय कर्मचारी पतसंस्थेच्या वतीने सभासद कर्मचाऱ्यांच्या ९० टक्केहून अधिक गुण प्राप्त करणाऱ्या गुणवंत पाल्यांचा विविध पारितोषिके देऊन सत्कार करण्यात आला.

        याप्रसंगी नर्सींग महाविद्यालयाचे प्राचार्य सर्वानन सेना, दंत महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. यतीश जोशी, रुग्णालय अधीक्षक डॉ. माले, फार्मसी कॉलेजचे प्राचार्य डॉ. होगाडे, डॉ. अरुणकुमार राव, डॉ. एन. व्ही. कुलकर्णी, डॉ. बबन आडगावकर, डॉ. विद्या कांदे, डॉ. चंद्रकला पाटील, डॉ. अमोल डोईफोडे, डॉ. कारंडे, डॉ. पठाण, डॉ. बी. एस. वारद, डॉ शैला बांगड, डॉ. क्रांती केंद्रे, मुख्य प्रशासकीय अधिकारी सचिन मुंडे, प्रशासकीय अधिकारी मधुकर गुट्टे, रुग्णालय प्रशासकीय अधिकारी श्रीपती मुंडे यांच्यासह एमआयएमएसआर वैद्यकीय महाविद्यालय व यशवंतराव चव्हाण ग्रामीण रुग्णालय, एमआयडीएसआर दंत महाविद्यालय, फिजीओथेरपी महाविद्यालय व नर्सिंग महाविद्यालयातील विभाग प्रमुख, प्राध्यापक, डॉक्टर, विद्यार्थी, पालक व नागरीक ध्वजारोहन कार्यक्रमासाठी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles