लातूर :– भारतीय जनता पार्टीच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या रेणापूर तालुका आमदार प्रिमिअम क्रिकेट स्पर्धेत समसापूर येथील सुपर किंग संघाने पहिल्या क्रमांकाचे पारितोषिक पटकावले. या स्पर्धेतील यशस्वी संघांना भारतीय जनता युवा मोर्चाचे प्रदेश सचिव युवा नेते ऋषिकेश रमेशआप्पा कराड यांच्या हस्ते पारितोषिकाचे वितरण करण्यात आले. यावेळी बोलताना ऋषिकेश कराड यांनी रेणापूर येथील क्रिडा संकूलाचे काम वर्षभरात पुर्ण होवून सर्व प्रकारच्या खेळाडूंची होणारी मोठी गैरसोय दूर होईल असे बोलून दाखविले.
रेणापूर तालुक्यातील मौजे समसापूर येथे आयोजित करण्यात आलेल्या आमदार प्रिमिअम क्रिकेट स्पर्धेत जवळपास आठ संघानी सहभाग घेतला होता. शेवटचा अंतिम सामना गुरुवार १३ मार्च रोजी सायंकाळी सुपरकिंग संघ समसापूर आणि कुणबी मराठा संघ पळशी यांच्यात झाला. अटीतटीच्या झालेल्या या शेवटच्या सामन्यात सुपरकिंग समसापूरच्या संघाने प्रथम क्रमांकाचे रोख 51 हजार रुपये व चषक पटकावले. तर कुणबी मराठा पळशीच्या संघाला द्वितीय क्रमांकावर समाधान मानावे लागले त्यांना रोख 31 हजार व चषक देण्यात आले.
भारतीय जनता युवा मोर्चाचे प्रदेश सचिव युवा नेते ऋषिकेश रमेशआप्पा कराड यांच्या शुभहस्ते या स्पर्धेतील प्रथम सुपरकिंग क्रिकेट संघ समसापूर, द्वितीय कुणबी मराठा संघ पळशी यांच्यासह तृतीय रेणुका क्रिकेट क्लब रामवाडी 21 हजार व चषक आणि चतुर्थ कला स्फूर्ती संघ कामखेडा 11 हजार रुपये व चषक याप्रमाणे पारितोषकाचे वितरण करण्यात आले. स्पर्धेतील वैयक्तिक पारितोषिकात मॅन ऑफ द सिरीज बेस्ट बॅट्समन सचिन शिंपले यांना तर बेस्ट बॉलरचे पारितोषक जनार्धन बगिले यांना देण्यात आले.
मोठ्या उत्साहाच्या वातावरणात झालेल्या बक्षीस वितरण कार्यक्रम प्रसंगी बोलताना ऋषिकेश कराड यांनी खेळ हा माझ्या जिव्हाळयाचा विषय आहे विविध खेळाच्या माध्यमातून खेळाडूंना सातत्याने संधी उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न केला. रेणापूर तालुक्यातील खेळाडू खिलाडी वृत्तीने मन लावून खेळ खेळतात असे गौराउद्गार काढून आपले नेते आ. रमेशअप्पा यांनी खेळाडूंच्या अडचणी लक्षात घेवून रेणापूर येथील क्रिडा संकुलास मुबलक निधी मंजूर करुन घेतला असून येत्या वर्षभरात रेणापूरच्या या क्रीडा संकलनाचे काम पूर्ण करून खेळाडूंना सर्व सोयी सुविधांनीयुक्त मैदान उपलब्ध होईल यासाठी आपण प्रयत्नशील असल्याचे बोलून दाखवले. प्रारंभी उपस्थित प्रमुख पाहुण्यांनी खेळाडू समवेत क्रिकेट खेळण्याचा आनंद घेतला.
यावेळी भाजपाचे तालुकाध्यक्ष दशरथ सरवदे यांनी प्रास्तावित केले, याप्रसंगी भाजपाचे डॉ. बाबासाहेब घुले, रेणापूरचे माजी नगराध्यक्ष अभिषेक आकनगिरे, युवा मोर्चाचे तालुकाध्यक्ष अमर चव्हाण, मदन चौधरी, अविनाश रणदिवे, भाऊसाहेब गुळबिले, लक्ष्मण यादव, सुनील चेवले, विजय चव्हाण, अच्युत कातळे, गुणवंत जाधव, नरेश चपटे, अमित काळे, रमा चव्हाण, वसंत फुलसे, मच्छिंद्र चक्रे, शरद राऊतराव, चंद्रकांत माने, महेश सुडे, काशिनाथ सांगळे, ईश्वर गोटके, भागवत पोतले, रोहित पांचाळ यांच्यासह अनेकांची उपस्थिती होती. उपस्थित मान्यवरांचे स्वागत स्पर्धा संयोजन समितीचे युवराज मुरकुटे, खंडू शिंदे, वैभव शिंदे, गौतम अंधारे, विजय मुरकुटे, सचिन शिंदे, पिंटू मुरकुटे, बालाजी अंधारे, पंकज काळे, सचिन अंधारे यांच्यासह अनेकांनी केले. बक्षीस वितरण समारंभास विविध संघाचे मालक खेळाडू यांच्यासह क्रिकेट प्रेमी तरुण मोठ्या संख्येने उपस्थित होते.
