अहमदपूर – स्व.दत्तात्रय हेलसकर यांनी १९९४ मध्ये स्थापन केलेल्या अखिल भारतीय साने गुरुजी कथामाला शाखा हेलसच्या वतीने पूज्य साने गुरुजी जयंतीनिमित्त हेलस कथामाला शाखा जालना आणि मानस फाऊंडेशनच्या सहकार्याने मराठवाडास्तरीय विभागीय कथाकथन स्पर्धा २१ डिसेंबर रोजी अहमदपूर येथील यशवंत विद्यालयात आयोजित करण्यात येत आहे. स्पर्धेचे हे पाचवे वर्ष असून विद्यार्थ्यांमधील सुप्त कलागुणांना प्रोत्साहित करण्यासाठी या स्पर्धेच्या आयोजन करण्यात आले आहे.
किशोर गट व बाल गट अशा दोन गटात होणाऱ्या या स्पर्धा विनाशुल्क असून मराठवाड्यातील सर्व व्यवस्थापनांच्या प्राथमिक व माध्यमिक शाळेतील विद्यार्थ्यांसाठी असल्याचे सांगण्यात आले आहे.
विजेत्या स्पर्धकांना प्रमाणपत्र व रोख बक्षिस देवून गौरवण्यात येणार असल्याचे संयोजक कल्पना हेलसकर, राम तत्तापुरे, चंद्रशेखर कळसे यांनी सांगितले. अधिक माहितीसाठी 9420036935, 9764330300, 9764744602