लातूर :– लातूर शहरात कांत्रटदारामार्फत अंगणवाड्यातून वाटप केला जाणारा खाऊ मोठ्या डब्यातून उघडा टमटम आटो रिक्षातून वाटप केला जातो. आज लातूर शहर पूर्व भाग नागरिक कृती समितीच्या वतीने एकात्मिक बालविकास प्रकल्प अधिकारी प्रियाका तारू यांची समितीचे अध्यक्ष दीपक गंगणे यांनी प्रत्यक्ष भेट घेण्यात आली. लातूर शहरातील अंगणवाड्यात होणाऱ्या खाऊ वाटपाची , स्वच्छता व सकस गुणवत्ता तपासणीची निवेदनाद्वारे मागणी केली.
लातूर शहरातून संबंध अंगणवाडी यांना पुरवठा होणारा दैनंदिन खाऊ वाटप गुणवत्ताहीन, दैनंदिन तोच तोच खिचडीचा उघडा अस्वच्छ खाऊ वाटप करण्यात येत आसल्याचे निदर्शनास आणून देऊन अंगणवाड्यातून दैनंदिन वाटप होणारा गरोदर माता , बालक यांच्याकरिता पौष्टिक सकस आहार , खाऊ यांची दैनंदिन माहिती अंगणवाडीच्या दर्शनी भागात फलकावर लावण्याच्या मागणीसह नुकतीच मदतनीसाची झालेली पदोन्नतीत कांहीं मदतनीसाची सेवाजेष्ठता व शैक्षणिक पात्रता असूनसुद्धा पदोन्नती लाभापासून डावलण्यात आल्याचे निदर्शनास आणून देऊन चौकशी करण्याची समितीचे अध्यक्ष दीपक गंगणे यांनी निवेदनाच्या माध्यमातून मागणी केली.
