20.8 C
New York
Saturday, July 5, 2025

वाहनासह 4 लाख 45 हजार रुपयाचा 11.7 किलो गांजा जप्त. तीन आरोपीवर गुन्हा दाखल.

याबाबत अधिक माहिती अशी की, दिनांक 10 जून रोजी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला माहिती मिळाली की,रेनापुर नाका जवळील बस स्थानक क्रमांक दोन च्या परिसरामध्ये दोन महिला व एक पुरुष ऑटो मध्ये बसून स्वताच्या आर्थिक फायदयासाठी मानवी आरोग्यास अपायकारक असलेला मादक पदार्थ गांजा अवैधरित्या ताब्यात बाळगुन त्याची चोरटी विक्री करीत आहे. सदरची माहिती वरीष्ठांना कळवून बसस्थानक क्रमांक दोन परिसरात दुपारी 5 वाजण्याच्या सुमारास छापा मारला. तेथे दोन महिला व एक पुरुष ऑटो मध्ये बसल्याचे आढळून आले. त्यांना ताब्यात घेऊन विचारपूस केली असता त्यांनी त्यांची नावे1) गोपाळ बालाजी डावखरे, वय 27 वर्ष, राहणार तानाजी चौक सध्या राहणार कृष्टधाम लातूर.2) मयुरी शंकर वाघमारे, वय 20 वर्ष, राहणार बालाजी नगर, सारोळा रोड, सध्या राहणार कृष्ठधाम लातूर.3) राधाबाई आश्रुबा गायकवाड, वय 60 वर्ष, राहणार भीम नगर, परभणी.असे असल्याचे सांगितले. यांना ताब्यात घेऊन ऑटोची झडती घेतली असता एका निळ्या रंगाच्या पोत्यामध्ये बी मिश्रित गांजा आढळून आला त्याचे मोजमाप केले तेव्हा ते 11 किलो 700 ग्राम किंमत अंदाजे 2 लाख 34 हजार रुपयाचा असल्याचे दिसून आले.
त्यावरून नमूद दोन महिला व एक पुरुष आरोपी विरुद्ध पोलीस ठाणे शिवाजीनगर येथे गुंगीकारक औषधीद्रव्य आणि मनोव्यापारावर परिणाम करणारे पदार्थ अधिनियम 1985 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आलेला असून 11.7 किलो गांजा, गुन्ह्यात वापरलेला ऑटो व दोन मोबाईल फोन असा एकूण 04 लाख 45 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक लातूर, श्री.सोमय मुंडे,अपर पोलीस अधीक्षक लातूर डॉ.अजय देवरे, यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संजीवन मिरकले, पोलीस उपनिरीक्षक राजाभाऊ घाडगे, पोलीस अंमलदार साहेबराव हाके, रियाज सौदागर, मनोज खोसे,जमीर शेख,नितीन कठारे, राहुल कांबळे, संजय कांबळे, मोहन सुरवसे, अर्जुन राजपूत, राजेश कंचे, सचिन धारेकर,बंडू नीटुरे, संतोष देवडे, महिला पोलीस अंमलदार कुंभार,अंजली गायकवाड यांनी उत्कृष्ठरित्या पार पाडली आहे.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles