राज्यात आठ वर्षे मुख्यमंत्री पद भूषविणारे विलासराव देशमुख हे कायम लोकांच्या हिताचे निर्णय घेणारे लोकमान्य लोकनेते. अशीच ओळख राज्याच्या कानाकोप-यात आहे. प्रत्येक क्षेत्रात त्यांनी त्यांच्या काळात भरीव योगदान देत लोकांच्या मनात कायम आदरातिथ्य मिळिवले. हसतमुख लोकनेते विलासराव देशमुख साहेब यांची आज २६ मे रोजी ८० वी जयंती त्यानिमित्ताने त्यांना विनम्र आदरांजली…
हाराष्ट्राच्या इतिहासात लोकहिताचे निर्णय घेणारे लोकनेते विलासरावजी देशमुख साहेब राज्यात व देशात स्वतः च्या कायांवर ओळख करून देणारे लोकनेते म्हणून आजही राज्यात देशात विलासराव देशमुख साहेब यांची ओळख कायम राहिलेली आहे. राज्यात आठ वर्षे मुख्यमंत्रीपद भूषवणारे विलासराव देशमुख हे कायम लोकांच्या हिताचे निर्णय घेणारे लोकमान्य लोकनेते अशी ओळख. राज्याच्या कानाकोपऱ्यात आहे. प्रत्येक क्षेत्रात त्यांनी त्यांच्या काळात भरीव योगदान देत लोकांच्या मनात कायम आदरातिथ्य असणारे हसतमुख लोकनेते विलासराव देशमुख साहेब यांची आज २६ मे रोजी त्यांची ८० वी जयंती. त्यानिमित्ताने त्यांना विनम्र आदरांजली. विकासाचा पहिला घास लातूरला. राज्यात जे नवं ते लातूरला हवं असं विलासराव देशमुख साहेबांचं नेहमी वाक्य असायचे. ते शब्दाला बांधील राहायचे. एक विकसनशील नेतृत्त्व म्हणून राज्याच्या कानाकोपऱ्यातून एकही जिल्हा नाही तिथं विलासराव देशमुख यांच्या हस्ते विकासाचं काम झाले नाही. प्रत्येक व्यक्तींना मदत करत आपल्या लातूरच्या लोकांना तर सहजपणे उपलब्ध राहायचे. कोण, कुठल्या राजकीय पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते असतील त्यांनाही मदत करायचे. हे सगळं करत असताना राज्यात कुठलाही निधी असेल किंवा नवीन योजना सुरू केली असेल तर लागलीच लातूरला ह्या असं रोखठोक बोलणारे शब्दाला चांधील असणारे लोकमान्य नेते विलासराव देशमुख साहेब होते. त्यांच्या कार्याचे कितीही आपण लिहीत बसलो तरी ते संपणार नाही. राज्यात नावलौकिक असलेल्या मोजक्या मुख्यमंत्रीपदाच्या यादीत विकासाभिमुख नेतृत्त्व म्हणून विलासराव देशमुख यांचे नाव आजही राज्यात घेतले जाते. लातूरला विकासाचा वेग
प्रचंड मोठा वाढवत मराठवाड्यात विकासभिमुख शहर म्हणून लातूरची ओळख राज्यभर लोकनेते विलासराव देशमुख साहेब यांच्यामुळे झाली. आजही लातूर म्हटले की विलासराव देशमुख साहेब यांचे लातूर अशी ओळख राहिलेली आहे. मराठवाड्यातील विभागीय कार्यालय लातूरला आणण्याचे काम त्यांच्याच कार्यकाळात झाले. विशेषतः विभागीय शिक्षण बोर्ड, विभागीय कृषि अधिकारी, सिंचन, विद्युत मंडळ, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय ही त्यांचीच देणं आहे.
असावे यावर विकासाचा प्लॅन तयार करून लातूर शहरात उड्डाण पूल बांधला. जिल्ह्यातील मुख्य सर्व शासकीय कार्यालये एकाच ठिकाणी आणून लोकांना चांगली सेवा कशी मिळेल अशी बऱ्याच गोष्टी त्यांनी केल्या. त्यामुळे आज आपल्याला शासकीय सुविधा उपलब्ध होत आहेत. त्याचे सर्व श्रेय लोकनेते विलासराव देशमुख साहेब यांच्याकडे जाते. हे निर्विवाद सत्य आहे. एकेकाळी मराठवाड्यात दुष्काळी भाग म्हणून लातूरची ओळख होती. ती पुसून
जाणाऱ्या सूतगिरणी, साखर उद्योग, जिल्हा बँका, याकडे जास्त लक्ष देत सर्व संस्थांना पक्षविरहित सर्वांना मदत केली. संस्था टिकल्या पाहिजेत, त्याशिवाय ग्रामीण भागातील लोकांना आर्थिक सुबत्ता मिळणार नाही, हे त्यांना सगळं माहित होते. त्यामुळे सहकार चळवळ अधिक मजबूत करण्याचे काम विलासराव देशमुख साहेब यांनी केले. त्यामुळे आज राज्यात सहकार चळवळीला योगदान देणारे व बंद पडलेले साखर उद्योग, सूतगिरण्या असतील, त्यांचे पुनर्जीवन केले,
साहेब यांनी मांजरा साखर कारखाना उभा केल्ला. पुढे सहकारात हळूहळू पकड बसल्याने त्यांनी रेणा, मारुती महाराज साखर कारखाने उभे केले. मांजरा साखर कारखाना सुरू केला. त्यांच्याच नेतृत्त्वाखाली याच परिवारातील संस्थांचे १० साखर कारखाने उभे राहिले आहेत. नुसते उभे राहिलेले नसून आज शेतकऱ्यांचे मंदिरे झालेली आहेत. याचे सर्व श्रेय लोकनेते विलासराव देशमुख यांना आहे. त्यानंतर दिलीपराव देशमुख साहेच यांनी या परिवारातील साखर कारखाने
दुष्काळ भाग ते विकासाच्या नव्या वाटेवर एकेकाळी मराठवाड्यात दुष्काळी भाग म्हणून लातूर जिल्ह्याकडे लोक बघायचे. मात्र १९९० सालापासून लातूरच्या विकासाची चळवळ सुरू झाली, लोकनेते विलासराव देशमुख राज्याचे मुख्यमंत्री झाले. त्यानंतर विकासाचा वेग प्रचंड मोठा झाला. रस्ते, सिंचन प्रकल्प सुरू झाले. वेगवेगळ्या योजना राबवून लातूरच्या विकासाला चालना मिळाली लोकनेते विलासराव देशमुख यांनी पुढच्या ५० वर्षाचे लातूर व्हिजन कसे
काढण्याचे काम साहेबांनी केले. आज लातूर म्हटले की, सवर्वांगीण विकास असलेले शांत शहर शिक्षण, व्यापार, उद्यो, इंडस्ट्रीज असलेले शहर म्हणून लातूरची ओळख राज्यभर राहिलेली आहे. राज्यात सहकार चळवळीला बळ त्यांनी दिले. राज्याचे मुख्यमंत्री माणून विलासराव देशमुख यांनी पदभार घेतला, तेव्हा सहकार चळवळ कोलमडून पडले काय अशी परिस्थिती निर्माण झाली होती. मात्र विलासराव देशमुख साहेबांनी राज्यातील सहकार तत्त्वावर चालवल्या
आज अनेक ठिकाणी साखर उद्योग, सहकारी सूतगिरण्या व्यवस्थित सुरू आहेत. त्यामुळे राज्याच्या कानाकोपऱ्यातून लोकांना आर्थिक सुबत्ता आली. रोजगार मिळाला, व्यापार वाढला, ते साहेच यांच्या कुशल निर्णयाने, मदत केल्याने राज्यभर उल्लेख होतो. या जिल्ह्यातील सहकार चळवळ वाढवली. राज्यात सर्वांना मदत करीत असताना लातूर जिल्ह्याला झुकते माप देण्याचे तत्कालीन मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांनी केले. ४० वर्षापूर्वी लोकनेते विलासराव देशमुख
अतिशय सूक्ष्म नियोजन पारदर्शकता ठेवून लोकांच्या विश्वासाला पात्र ठरली आहेत. राज्यात आज सहकार क्षेत्र म्हटले की, लातूरचा नावलौकिक असा उललेख होतोय, त्यामागे लोकनेते विलासराव देशमुख साहेब यांच्या कार्याची आठवण आहे. त्यांनी केलेले कार्य लोकांच्या सेवेसाठी तत्पर सेवेत राहणारे विलासराव देशमुख साहेब कायम आठवणीचे
लोकमान्य लोकांचे लोकनेते म्हणून जीवन जगले. आज त्यांच्या कार्यामुळे राज्यात
विलासराव देशमुख साहेब यांच्यावर प्रेम करणारा लाखो चाहता वर्ग आहे. लोकनेते विलासराव देशमुख साहेब यांची आज ८० वी जयंतीनिमित्त विनम्र आदरांजली. तुमच्या स्मृतींना समर्पित काही घोषवाक्येः सत्कर्मयोगे जीवन घालवावे, सर्वा मुखी मंगल बोलवावे। कार्यातुनी येथे करली अवधी आपली किर्ती दिपस्तंभ हा विचारांचा, जपूया ठेवा लोकसेवेचा स्मरण होता तुमचे, चैतन्य लाभते मनाला! खरी ती एकच सेवा, करीत जावी लोकसेवा! शुद्ध निर्मळ केली लोकसेवा, आपल्या नेतृत्वाचा महिमा ! लोकसेवेचा हा वसा, आपला लाभला वारसा! तुमच्या कार्याची ज्योत, युगायुगांसाठी प्रेरणास्त्रोत । लोकसेवेचा मार्ग दाखविला, आपला महिमा अपार। दिपले डोळे, जोडले हात, लोकसेवेचे कार्य आपले महान। नांदतो सदा सुखाने, कीर्ती गातो मुखाने । कल्याण केले जनाचे, कीर्ती गातो मुखाने आपले कार्य इथले पाहता, वाटते तुम्ही येथेच राहता ! स्वप्न तुमची, समर्पण आमचे…। प्रेरणा तुमची मनात स्मृती, लोकसेवेचा मार्ग दाखवती! नित्य स्मरते आपली मूर्ती, अविरत जपूया विचार, कीर्ती! लोकसेवेत समर्पित कतृत्व ! लोकभक्तितुनी आकारले नेतृत्व। जाणत्याचे जाणावे प्रसंग, जाणत्याचे घ्यावे रंग। तेजस्वी जीवने जयाची, अंतरी तळमळ लोकसेवेची! साच आणि मवाळ, मितळे आणि रसाळ, शब्द जैसे कल्लोळ अमृताचे! लोकसेवेत साकारले कतृत्व ! लोकभक्तित अर्पिले नेतृत्व ! तुमचे नेतृत्व लाभले आम्हांला, सुजलाम सुफलाम झाली भूमी। स्मरण होता तुमचे, प्रेरणा मिळते लोकसेवेला । आपले कार्य एका युगाचे, स्मरण राहील युगायुगाचे । तेजस्वी जीवने जयांची, अंतरी तळमळ लोकसेवेची। त्यांच्या कार्याला सलाम.
-हरीराम कुलकर्णी, जेष्ठ पत्रकार, लातूर
