27.4 C
New York
Sunday, July 6, 2025

लातूर शहरातील आनंद लॉजवर छापा, 10 जनाविरुद्ध गुन्हा दाखल

लातूर:- शहरातील शिवाजी रोड स्क्रॅप मार्केट जवळ असलेल्या आनंद लॉजवर AHTU शाखेने छापा टाकून 2 महिलेची सुटका केली व वेश्याव्यवसाय चालविणाऱ्या 10 आरोपीं विरुद्ध गांधी चौक पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल केला आहे. लातूर शहरातील शिवाजी रोड स्क्रॅप मार्केट जवळील आनंद लॉज मध्ये वेश्याव्यवसाय चालविला जात असल्याबाबत गुप्त माहिती मिळाल्याने सदर बाबत कडक कारवाई करणेसाठी पोलीस अधीक्षक सोमय मुंडे यांचे कडून सक्त आदेश पारित झाले होते. त्याअनुषंगाने आनंद लॉज चा मालक, मॅनेजर व त्यांचे साथीदार परराज्यातील महिलांना लॉज वर आणून वेश्यागमनासाठी एजंट करवी गिऱ्हाईक आणून वेश्या व्यवसाय चालवीत आहेत अशी गुप्त माहिती प्राप्त होती. मिळालेल्या माहितीची खातरजाम करून त्याबाबत वरिष्ठ अधिकाऱ्यांचे मार्गदर्शनाखाली AHTU पथकाने 20 मे रोजी 2 वाजे सुमारास आनंद लॉज, शिवाजी रोड, स्क्रॅप मार्केट, लातूर येथे बनावट ग्राहक वेश्यागमनाच्या नावाखाली लॉजवर पाठविण्यात आला होता. बनावट ग्राहकाकडून इशारा मिळतात पथकाकडून आनंद लॉजवर छापा टाकण्यात आला. सदर छाप्यात बाहेर राज्यातून आलेल्या दोन महिला मिळून आल्या तर लॉज मॅनेजर व इतर साथीदार अशा 07 जणांना लॉज वरून ताब्यात घेण्यात आले आहे. सदर प्रकरणी वेश्या गमनासाठी आणलेल्या 2 महिलांची सुटका करण्यात आली आहे तर आनंद लॉजचे चालक, मालक व ईतर सहकारी अशा 10 आरोपीतांविरुद्ध गांधी चौक पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आला. सदरची कारवाई पोलिस अधीक्षक सोमय मुंडे, अपर पोलिस अधीक्षक डॉ. अजय देवरे, लातूर यांचे मार्गदर्शनात, AHTU पथकाचे पोलीस निरीक्षक समाधान चवरे, पोलिस उपनिरीक्षक सुभाष सूर्यवंशी, श्यामल देशमुख, पोलीस अंमलदार राजाभाऊ सूर्यवंशी, सदानंद योगी, सुधामती वंगे-यादव, लता गिरी यांनी केली.

सदर गुन्ह्यातील आरोपी 1) किशोर नरहरी तळेकर, रा. म्हाडा कॉलनी, लातूर, 2) श्याम किशोर तळेकर, रा. म्हाडा कॉलनी, लातूर, 3) शाहु तळेकर सर्व रा. म्हाडा कॉलनी, लातूर हे फरार असून  4) अमोल अंकुश काळुंके, वय 20 वर्षे, रा. म्हाडा कॉलनी, बाभळगाव रोड, लातुर, 5) संतोष किशोर तळेकर, वय 30 वर्ष, रा. म्हाडा कॉलनी, लातुर 6) अजय तात्याराव कांबळे, वय 40 वर्ष, रा.उटगे नगर, लातूर, 7) सौरभ अंबादास बिराजदार, वय 25 वर्ष, व्यवसाय-शिक्षण रा. जिजामाता नगर, ता. तुळजापुर जि. धाराशिव 8) समर्थ नितीन भोसले, वय 21 वर्ष, व्यवसाय-पुजारी, रा.शुक्रवार पेठ, ता. तुळजापुर जि. धाराशिव 9) समर्थ धन्यकुमार कवडे, वय 22 वर्ष, व्यवसाय-फोटोग्राफी, रा.शुक्रवार पेठ, ता. तुळजापुर जि. धाराशिव 10) विश्वजीत मोहन शिंदे, वय 19 वर्ष, व्यवसाय-शिक्षण, रा. शुक्रवार पेठ, ता. तुळजापुर जि. धाराशिव  यांना अटक करण्यात आली आहे

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles