52 व्या राज्यस्तरीय ज्यूदो स्पर्धेत लातूरच्या वेदांत व स्वप्निलचा झंझावात

0
398

27 जिल्ह्यांमधील 334 खेळाडूंनी सहभाग नोंदवला

लातूर : पुनीत बाळन ग्रुप प्रस्तुत 52 व्या राज्यस्तरीय सब-ज्युनिअर ज्यूदो स्पर्धेचा थाटात शुभारंभ झाला. या वेळी अँड. दीपक सुळ यांनी विद्यार्थीदशेतूनच खेळाचे महत्त्व अधोरेखित करत खेळामुळे शारीरिक, मानसिक कणखरता तर वाढतेच, शिवाय शिस्तीचे गुणही आत्मसात होतात असे प्रतिपादन केले. ते म्हणाले की, ज्यूदोसारख्या युद्धकला खेळामुळे विद्यार्थी भविष्यात सैन्य, पोलीस किंवा पॅरा-मिलिटरी क्षेत्रातही चमकदार कारकीर्द घडवू शकतात.

स्पर्धेचे आयोजन महाराष्ट्र ज्यूदो असोसिएशनतर्फे करण्यात आले असून यजमान लातूर ज्यूदो संघटना आहे. स्पर्धा गिरवलकर मंगल कार्यालय येथे पार पडत असून 13 ते 15 वयोगटातील 27 जिल्ह्यांमधील 334 खेळाडूंनी सहभाग नोंदवला आहे.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राज्य संघटनेचे अध्यक्ष शैलेश टिळक होते. प्रमुख पाहुणे म्हणून योगेश गिरवलकर, सिद्धेश्वर बिराजदार उपस्थित होते. सूत्रसंचालन डॉ. अशोक वाघमारे यांनी केले, तर प्रास्ताविक डॉ. प्रदीप देशमुख यांनी केले. व्यासपीठावर राज्य ज्यूदो संघटनेचे महासचिव दत्ता आफळे, कोषाध्यक्ष रविंद्र मेटकर, डॉ. गणेश शेटकर, सुरेश समेळ, मुकुंद डांगे, तिलक थापा, दिनेश बागूल, दर्शना लाखाणी, योगेश धाडवे, अतुल बामनोदकर, सचिन देवळे, निखील सुवर्णा, योगेश शिंदे, आशिष क्षिरसागर, डॉ. संपत साळुंके यांची उपस्थिती होती.

उद्घाटनप्रसंगी ज्यूदो खेळातील शिवछत्रपती पुरस्कारप्राप्त यशवंत दांगट, प्रसाद मोकाशी, अतुल शेलार, तुषार मालोदे यांचा सत्कार करण्यात आला. तसेच आंतरराष्ट्रीय पंच परीक्षेत यश मिळवलेल्या सुरेश कनोजिया यांचाही गौरव करण्यात आला.

आज झालेल्या स्पर्धांमध्ये यजमान लातूरच्या वेदांत मुंडे आणि स्वप्निल सोनवणे यांनी प्रभावी कामगिरी केली. 60 किलोखालील गटात वेदांत मुंडेने मुंबईच्या आर्यन खरेशी उपांत्य फेरीत जबरदस्त लढत देत रौप्य पदक पटकावले. तर 55 किलोखालील गटात स्वप्निल सोनवणेने कांस्य पदक मिळवले.

या स्पर्धांमधून राष्ट्रीय स्पर्धेसाठी महाराष्ट्र संघात निवड करण्यात आली. स्वरूप परदेसी, विराज तरवडे, वेदांत मुंडे, प्रतिक व्यवहारे, ओंकार काकड, अर्जुन चोडणकर, आर्यन खरे, देव गौतम आणि कुश पंडित यांनी प्रथम क्रमांक पटकावून आपली जागा निश्चित केली आहे.

स्पर्धेतील इतर गटांमध्ये खालील खेळाडूंनी पदके पटकावली :

30 किलोखालील गट:
सुवर्ण – विराज तरवडे (पीजेए),
रौप्य – शुभम भंडारी (ठाणे),
कांस्य – यश पगारे (धुळे), अफान वर्षानी (यवतमाळ)

35 किलोखालील गट:
सुवर्ण – वेदांत परदाई (यवतमाळ),
रौप्य – विराज भगत (नाशिक),
कांस्य – अथर्व सानप (अमरावती), आयुष चौधरी (क्रीडा प्रबोधिनी)

40 किलोखालील गट:
सुवर्ण – प्रतिक व्यवहारे (क्रीडा प्रबोधिनी),
रौप्य – प्रज्वल यादव (कोल्हापूर),
कांस्य – नक्षसिंग राजपूत (सांगली), समर्थ राऊत (पीजेए)

45 किलोखालील गट:
सुवर्ण – ओंकार काकड (छ. संभाजीनगर),
रौप्य – अर्जुन नरोडे (क्रीडा प्रबोधिनी),
कांस्य – ओजस सुकळकर (वर्धा), विश्वजित घाडगे (सांगली)

50 किलोखालील गट:
सुवर्ण – कुश पंडित (ठाणे),
रौप्य – युवराज चौधरी (नागपूर),
कांस्य – नीरज कांबळे (सांगली), अर्श बालापुरे (यवतमाळ)

55 किलोखालील गट:
सुवर्ण – स्वरूप परदेसी (कोल्हापूर),
रौप्य – भुविक पुजारी (ठाणे),
कांस्य – श्रेयस दंडगव्हाळ (छ. संभाजीनगर), स्वप्निल सोनवणे (लातूर)

60 किलोखालील गट:
सुवर्ण – आर्यन खरे (मुंबई),
रौप्य – वेदांत मुंडे (लातूर),
कांस्य – हर्षवर्धन पाटील (कोल्हापूर), उज्वल पहारे (अहिल्यानगर)

66 किलोखालील गट:
सुवर्ण – अर्जुन चोडणकर (मुंबई),
रौप्य – शौर्याजित माळी (सांगली),
कांस्य – अथर्व मोरे (पीजेए), पार्थ साप्ते (धाराशिव)

66 किलोवरील गट:
सुवर्ण – देव गौतम (रायगड),
रौप्य – मनोज चौधरी (पीडीजेए),
कांस्य – प्रतिक मदाने (सोलापूर), तरणजीत सिंग (अमरावती)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here