अल्पसंख्याक समाजाने शिक्षणातून प्रगती साधावी: मोईजभाई शेख
लातूर – अल्पसंख्याक समाजातील विद्यार्थ्यांनी उच्च शिक्षण घेऊन समाजाच्या मुख्य प्रवाहात यावे आणि बदलत्या काळानुसार स्पर्धेत यशस्वी व्हावे, असे आवाहन अखिल भारतीय काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस मोईजभाई शेख यांनी केले. महाराष्ट्र राज्य उर्दू शिक्षक संघटनेच्या वतीने लातूर येथील कॉक्सिट कॉलेज सभागृहात १४ सप्टेंबर २०२५ रोजी आयोजित राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार सोहळ्यात ते बोलत होते.
कार्यक्रमात आदर्श शिक्षकांचा गौरव करताना मोईजभाई शेख म्हणाले, “अल्पसंख्याक समाजाने केवळ शिक्षण घेऊन थांबू नये, तर उच्च विद्याविभूषित होऊन आपली आणि समाजाची प्रगती करावी.” शिक्षणाचे महत्त्व ओळखून विद्यार्थ्यांनी स्पर्धा परीक्षांमध्ये भाग घ्यावा आणि उच्च पदांवर पोहोचावे, असे आवाहनही त्यांनी केले.
या सोहळ्याला महाराष्ट्र राज्य उर्दू शिक्षक संघटनेचे राज्याध्यक्ष एम. ए. गफार, लातूरचे खासदार डॉ. शिवाजी काळगे आणि शिक्षक आमदार विक्रम काळे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. या कार्यक्रमात आदर्श शिक्षकांना पुरस्कार देऊन त्यांच्या कार्याचा गौरव करण्यात आला.


