लातूर : राज्य व केंद्र सरकारमधील लोकांनी विकासकामे न करता समाजातील तेढ कसे निर्माण होईल याकडेच सरकार प्रयत्न करत असल्याचा घणाघात राज्याचे माजी मंत्री सहकार महर्षी दिलीपराव देशमुख साहेब यांनी येथे बोलताना व्यक्त करून विकास विश्वास प्रगती करणाऱ्या काँग्रेसच्या पाठीमागे येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत ऊभे राहून अमित देशमुख,धीरज देशमुख यांना अधिकाधिक मताधिक्य द्यावे असे आवाहन त्यांनी यावेळी केले ते लातूर ग्रामीण विधानसभा मतदार संघातील भातांगळी जिल्हा परीषद सर्कलस्मधील काँग्रेस पदाधिकारी कार्यकर्ते यांच्याशी संवाद बैठक रविवारी घेण्यात आली त्यावेळी ते बोलत होते यावेळी व्यासपिठावर लातूर ग्रामीणचे आमदार धीरज विलासरावजी देशमुख, माजी आमदार वैजनाथराव शिंदे, साखर महासंघाचे संचालक आबासाहेब पाटील, बाजार समितीचे सभापती जगदीश बावणे, जागृति शुगर चें उपाध्यक्ष लक्ष्मणराव मोरे, मांजरा साखर कारखान्याचे माजी अध्यक्ष धनंजय देशमुख, मारुती महाराज साखर कारखान्याचे अध्यक्ष शाम भोसले,माजी जिल्हा परिषद अध्यक्ष संतोष देशमुख जनार्दन वंगवाड,काँग्रेस तालुका अध्यक्ष सुभाष घोडके, वाल्मीक माडे, मनोज पाटील, राजेसाहेब पाटील, मधुकर पाटील,अँड श्रीरंग दाताळ, प्रताप पडिले,जब्बार सगरे, सुनील पडिले, राजकुमार पाटील अनुप शेळके,अँड प्रवीण पाटील, दगडू पडिले,सचिन दाताळ, शंकरराव बोलंगे,रघुनाथ शिंदे, हरिराम कुलकर्णी, उपस्थित होते
प्रपंच विकासाच्या मुद्दे बाजूला ठेवून सरकारचे लक्ष दुसरीकडे
केंद्र व राज्य सरकार एकाच विचाराचे असताना त्यांनी समाजातील विविध प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्न न करता ते प्रश्न तसेच झुलवत ठेवले असून कोंग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी समाजाचे आरक्षण ५० टक्क्यांहून ७० टक्के पर्यंत घेवून जाण्याची मागणी केली ती अतिशय रास्त मागणी आहे असे सांगून समाजात आर्थिक सुबत्ता, प्रगती, समानता येण्यासाठी आरक्षण आवश्यक आहे आज राज्यातील विविध समाज आपल्या हक्कासाठी सरकार दरबारी मागणी करत आहेत मात्र याकडे सरकारचे पूर्णपणे दुर्लक्ष करून समाजात फूट पाडण्याचे प्रयत्न सुरू आहेत यापासून आपण सावध रहावे आगामी विधानसभा निवडणुकीत काँग्रेस आघाडीच्या उमेदवारांना भरभरून आशीर्वाद द्यावेत असे आवाहन माजी मंत्री दिलीपराव देशमुख यांनी केले आहे

४० वर्षापासून नेतृत्व व नाते जपले पुढेही जपणार
यावेळी बोलताना माजी मंत्री दिलीपराव देशमुख साहेब यांनी लातूर जिल्ह्यात लोकनेते विलासराव देशमुख साहेब यांनी गेल्या ४० वर्षात या नेतृत्वाने आपले नाते जपले असून आपल्याला जो शब्द त्यांनी दिला तो पाळला का नाही? आपल्या प्रगतीमध्ये मागे कोण आहे हे वळून पाहिले पाहिजे आपले आजोबा पणजोबा वडील यांच्यासोबत आपले नाते कायम जपले आहे यापुढेही आपले नाते जपू असे सांगून गाव पातळीवरील वैयक्तिक हेवेदावे विसरून जा मोजून आपले बूथ प्लस करा आपल्या भागाचा विकास करून घेण्यासाठी लातूर शहरातून आमदार अमीत देशमुख, लातूर ग्रामीण विधानसभा मतदार संघातून धीरज देशमुख यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहून अधिक मताधिक्य द्यावे असे आवाहन त्यांनी केले
१५०० कोटी रुपयांची विकासकामे केली–
आमदार धीरज देशमुख
यावेळी बोलताना लातूर ग्रामीणचे आमदार धीरज देशमुख यांनी मागच्या पाच वर्षाच्या काळात लातूर ग्रामीण विधानसभा मतदार संघात मी विरोधी पक्षातील आमदार असतानाही सरकार दरबारी प्रयत्न करून १५०० कोटी रुपयांची विकासकाने खेचून आणली असून त्यात भातांगळी जिल्हा परिषद सर्कल मध्ये 16 गावात 229 कामे मंजूर करून तब्बल 17 कोटी रुपये विविध विकास कामासाठी निधी आणला अनेक कामे झाली तर काही कामे प्रगती पथावर असल्याचे सांगून जिल्हा बँकेच्या माध्यमातून लाडकी बहिण योजना अंतर्गत जिल्ह्यातील ३२,००० खाते उघडून महिला भगिनींना निःशुल्क सेवा दिली आहे ही आमची सामाजिक बांधिलकी म्हणून कार्य केले आहे आगामी काळात मतदारांनी काँग्रेसला साथ द्यावी असे आवाहन त्यांनी करून लोकांच्या प्रगतीसाठी विकासाचा वेग अधिक सुरू ठेवण्यासाठी काँग्रेसला अधिक मताधिक्य द्यावे असे आवाहन त्यांनी केले.
विकासाची विश्वासाची परंपरा कायम ठेवण्यासाठी काँग्रेसला साथ द्या–माजी आमदार वैजनाथदादा शिंदे
लोकनेते विलासराव देशमुख, माजी मंत्री दिलीपराव देशमुख साहेब यांनी लातूर ग्रामीण विधानसभा मतदार संघात विकासाची कामे केलेली आहेत विविध योजना राबवून शेतकऱ्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्याचे काम याच मांजरा परिवाराने केले असून आपली प्रतिष्ठा कायम ठेवण्यासाठी काँग्रेसला साथ द्यावी आमदार धीरज देशमुख यांना पुन्हा एकदा निवडून द्यावे असे आवाहन त्यांनी केले.
यावेळी आबासाहेब पाटील,तालुका काँग्रेस अध्यक्ष सुभाष घोडके, श्री जनार्दन वंगवाड जब्बार सगरे, श्री हरीश बोळंगे, प्रा संदीप शिरसाट, सुशांत मुळे, कमलाकर अनंतवाड यांच्यासह यांनी यांनी विचार मांडले याप्रसंगी भातांगळी गनातील कोंग्रेसचे पदाधिकारी जितेंद्र स्वामी, संभाजी रेड्डी, सतीश पाटील, बंडू पाटील, गरड, डोके, मुळे , विर,बाजार समितीचे संचालक, मांजरा रेणा विलास साखर कारखान्याचे संचालक मंडळ विविध पदाधिकारी, कार्यकर्ते सोसायटीचे चेअरमन, सरपंच शैक्षणीक संस्थांचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते

