27.4 C
New York
Saturday, July 5, 2025

06 लाख 10 हजार रुपयांचा 61 किलो गांजाच्या झाडासह दोन जण ताब्यात

पोलीस अधीक्षक सोमय मुंडे यांचे आदेशान्वये लातूर जिल्ह्यातील अवैध धंद्यावर जोरदार कार्यवाही करण्यात येत आहे. त्याअंतर्ग 19 मे रोजी देवणी पोलीस ठाण्यांतर्गत तोगरी शेत शिवारात देवणी पोलिसांनी वरिष्ठांच्या मार्गदर्शनात मोठी कारवाई करत तोगरी शिवारात एका शेतातून 06 लाख 10 हजार रुपयांचा लागवड करण्यात आलेला गांजा जप्त करण्यात आले आहे. देवणी तालुक्यातील तोगरी शेत शिवारात गांजाची लागवड होत असल्याची गुप्त माहिती मिळाली होती. त्याअधारे पोलीस अधीक्षक सोमय मुंडे, अपर पोलीस अधीक्षक डॉ. अजय देवरे यांचे मार्गदर्शनात देवणी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक माणिक डोके यांच्या नेतृत्वातील पथकाने तोगरी शिवारातील गंगाराम हाकू चव्हाण यांच्या शेतात छापा टाकून गांजाची 61 किलो वजनाची 28 झाडे जप्त केली आहे. या प्रकरणी पोलीस ठाणे देवणी येथे गुन्हा दाखल करण्यात आला असून सदर गुन्ह्यात शेतमालक  गंगाराम हाकू चव्हाण,  संतोष गंगाराम चव्हाण, दोघे राहणार तोगरी ,तालुका उदगीर जिल्हा लातूर. यांना अटक करण्यात आली आहे. गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक वऱ्हाडे हे करीत आहेत.
सदरची कारवाई वरिष्ठांचे मार्गदर्शनात पोलीस ठाणे देवणी सहाय्यक पोलीस निरीक्षक माणिक डोके यांच्या नेतृत्वात सहभागी अधिकारी अमलदार सपोनी डोके, पोलिस उपनिरीक्षक गोंड, पोलिस उपनिरीक्षक वराडे,पोलिस उपनिरीक्षक डफडवाड, पोलिस अमलदार कोंडामंगले, कलवले, गुणाले, डोईजोडे, कुरे, शटकार, बिरादार यांनी केली आहे.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles