सेवाधारी ज्येष्ठ नागरिक संघटनेतर्फे जागतिक ज्येष्ठ नागरिक दिन उत्साहात साजरा

0
137

नवी मुंबई (प्रतिनिधी) – सेवाधारी ज्येष्ठ नागरिक संघटना, सिवूड यांच्या वतीने जागतिक ज्येष्ठ नागरिक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमात प्रमुख वक्ते म्हणून आजी केअर सेवक फाऊंडेशन चे सीईओ प्रकाश बोरगांवकर उपस्थित होते.

आपल्या प्रेरणादायी व्याख्यानात त्यांनी ज्येष्ठ नागरिकांनी आनंदी राहण्यासाठी जीवनाकडे सकारात्मक दृष्टीने पाहण्याचा सल्ला दिला. “आज सरासरी आयुर्मान वाढले आहे, त्यामुळे ज्येष्ठांची संख्या मोठी आहे. मात्र समस्या मोठ्या मानून न चालता, समाजात मिसळून हसत-खेळत राहिले तर जीवन सुंदर वाटते,” असे बोरगांवकर यांनी सांगितले.

कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान संस्थेचे अध्यक्ष सुधाकर पाटील यांनी भूषविले. या वेळी नवी मुंबई महानगरपालिकेतर्फे झालेल्या विविध स्पर्धांमध्ये बक्षिसे मिळवणारे सुनील बंदरकर यांचा विशेष सत्कार करण्यात आला. तसेच कॅरम, बुद्धिबळ आदी स्पर्धांमध्ये सहभागी झालेल्या सदस्यांचाही गौरव करण्यात आला.

कार्यक्रमाचे नियोजन आणि सूत्रसंचालन उपाध्यक्ष सुरेश पोटे यांनी केले. संस्थेचे सचिव नामदेव इंदुलकर यांनी श्री. प्रकाश बोरगांवकर आणि त्यांच्या पत्नींचा सत्कार करून उपस्थित सर्व ज्येष्ठ सदस्यांचे आभार मानले.
कार्यक्रमास संघटनेचे सर्व कार्यकारी मंडळ सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here