लातूर, शहर प्रतिनिधी : भारताच्या अग्रगण्य ज्वेलरी ब्रँड कल्याण ज्वेलर्सने लातूरमधील कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी, मेन रोड येथे आपला नवीन शोरूम उभारला. या शोरूमचे उद्घाटन सुप्रसिद्ध अभिनेत्री जेनेलिया डिसुझा यांच्या हस्ते करण्यात आले. या भागातील ब्रँडची उपस्थिती अधिक मजबूत करण्यासाठी तसेच ग्राहकांना उत्कृष्ट खरेदीचा अनुभव देण्यासाठी हा शोरूम उभारण्यात आला आहे. नवीन शोरूममध्ये कल्याण ज्वेलर्सची विविध इन-हाऊस ब्रँड् उपलब्ध आहेत, जसे की मुहूर्त (लग्नाचे दागिने), मुद्रा (हस्तकला केलेले अँटिक दागिने), निमा (मंदिर शैलीतील दागिने) यासह अनेक लोकप्रिय कलेक्शन्स. शाही थाट आणि आकर्षक डिझाइन्सचा खजिना असलेले हे स्टोर ग्राहकांना खरेदीचा अद्वितीय अनुभव प्रदान करेल.अभिनेत्री जेनेलिया डिसुझा म्हणाल्या, कल्याण ज्वेलर्सच्या या नवीन शोरूमचे उद्घाटन करताना मला खूप आनंद होत आहे. विश्वास, पारदर्शकता आणि ग्राहक-निष्ठेला महत्त्व देणाऱ्या ब्रँडचे प्रतिनिधित्व करणे माझ्यासाठी सन्मानाची बाब आहे. इथले दर्जेदार दागिने आणि उत्कृष्ट सेवा ग्राहकांच्या मनाला नक्कीच भुरळ घालतील. कल्याण ज्वेलर्सचे कार्यकारी संचालक रमेश कल्याणरामन म्हणाले, लातूरमधील हा नवीन स्टोर ग्राहकांच्या बदलत्या गरजा पूर्ण करणारा, दागिन्यांच्या खरेदीसाठी परिपूर्ण केंद्र ठरावा, ही आमची अपेक्षा आहे. जागतिक दर्जाच्या वातावरणात आणि सेवेतून एक उन्नत अनुभव देण्याची आमची वचनबद्धता कायम आहे.नवीन शोरूममध्ये ग्राहकांसाठी अनेक खास ऑफर्स जाहीर करण्यात आल्या आहेत. साध्या सोन्याच्या दागिन्यांच्या मजुरीवर प्रति ग्रॅम ७५० रुपये, प्रीमियम व जडाव (Studded) दागिन्यांच्या मजुरीवर प्रति ग्रॅम १५०० रुपये, तसेच टेम्पल आणि अँटिक दागिन्यांच्या मजुरीवर प्रति ग्रॅम १००० रुपये फ्लॅट सवलत देण्यात येत आहे. याशिवाय ‘कल्याण स्पेशल गोल्ड बोर्ड रेट’ देखील लागू असेल.सर्व दागिने बीआयएस (BIS) हॉलमार्कसह असून ग्राहकांना ब्रँडचे ‘४-स्तरीय आश्वासन प्रमाणपत्र’ दिले जाते. यात सोन्याची शुद्धता, आजीवन मोफत देखभाल, उत्पादनाची माहिती तसेच पारदर्शक एक्सचेंज व बाय-बॅक धोरण याची हमी दिली जाते.शोरूममध्ये कल्याण ज्वेलर्सचे लोकप्रिय हाऊस ब्रँड् मुहूर्त, मुद्रा, निमा, ग्लो, झिया, अनोखी, अपूर्वा, अंतरा, हेरा, रंग आणि अलीकडेच लाँच केलेले लीला कलेक्शन्स उपलब्ध आहेत.


