लातूर – श्री महात्मा बसवेश्वर शिक्षण संस्था, लातूर द्वारा संचलित सर्व शाखा आणि लिंगायत शरण फाउंडेशन, लातूर यांच्या संयुक्त विद्यमाने जगतज्योती महात्मा बसवेश्वर जयंती महोत्सवानिमित्त विशेष व्याख्यान आणि श्री महात्मा बसवेश्वर शिक्षण संस्था नूतन कार्यकारणी वर्षपूर्ती निमित्त अभिष्टचिंतन सोहळा महात्मा बसवेश्वर महाविद्यालयामध्ये महाराष्ट्र आणि कामगार दिनाचे औचित्त साधून खुल्या सभागृहामध्ये आयोजित करण्यात आला आहे यावेळी ते प्रमुख वक्ते म्हणून “भारतीय ज्ञान परंपरेतील सुवर्ण पर्व : बसवक्रांती” या विषयावर ते बोलत होते.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ, नांदेडचे संस्थापक कुलगुरू तथा माजी खासदार प्रसिद्ध विचारवंत डॉ. जनार्दन वाघमारे, प्रमुख पाहुणे माजी प्राचार्य तथा इतिहास तज्ञ प्राचार्य डॉ. सोमनाथ रोडे, माजी प्राचार्य तथा ज्येष्ठ विचारवंत प्राचार्य डॉ. नागोराव कुंभार, सुप्रसिद्ध लेखक तथा बसव विचाराचे प्रचारक राजू जुबरे, श्री महात्मा बसवेश्वर शिक्षण संस्थेचे अध्यक्ष आदिनाथ सांगवे, सचिव माधवराव पाटील टाकळीकर, सहसचिव सुनीलजी मिटकरी साहेब, प्रदीप दिंडेगावे, संचालक बस्वराज (राजू) येरटे, संचालक बाबुराव तरगुडे यांची उपस्थिती होती.
कार्यक्रमाच्या प्रारंभी सर्व मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन झाले त्यानंतर संगीत विभागाचे प्रा. विश्वनाथ स्वामी, प्रा. गोविंद पवार आणि सर्व गुणवंत विद्यार्थ्यांनी स्वागत गीत आणि महाराष्ट्र दिन सादर केले.
यावेळी सहसचिव सुनीलजी मिटकरी यांनी महात्मा बसवेश्वर शिक्षण संस्थेच्या शैक्षणिक कार्याचा लेखाजोखा प्रस्ताविकाचच्या अल्प वेळामध्ये आपल्यासमोर मांडण्याचा स्तुत्य प्रयत्न केला.
पुढे बोलताना उत्तम कांबळे म्हणाले की, महात्मा बसवण्णांनी देवालयाकडून देहाकडे चला ही संकल्पना मांडली. आपण आपल्या देहाद्वारे कष्ट करून जीवन जगले पाहिजे त्यांनी अंधाराविरुद्ध उजेडाची लढाई केली. तथागत भगवान बुद्धाने सुद्धा हा अंधार दूर करण्याचा प्रयत्न केला. अनुभव मंडप म्हणजे वैचारिक मंथन करणारे विचारपीठ आहे असे सांगून आंधळ्या कबीराची गोष्ट सांगून त्यांनी सभागृहातील उपस्थितयांची मने जिंकली. युद्ध जिंकण्यासाठी स्वातंत्र्य, समता आणि बंधुता मनामध्ये असली पाहिजे. महात्मा बसवेश्वरांनी आपल्या विचार कार्यातून एक महान सामाजिक, धार्मिक आणि सांस्कृतिक क्रांती घडवून आणली. अनुभव मंटपातील मनन, चिंतन, लेखनातून प्राप्त झालेली तत्वे मूल्ये तिचा स्वीकार भारतीय संविधानाने देखील केला आहे असेही ते म्हणाले.
यावेळी राजू जुबरे यांनी महात्मा बसवेश्वरांनी मानवी कल्याणासाठी केलेल्या कार्याची माहिती सर्वांना दिली
याप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून बोलताना प्रसिद्ध विचारवंत डॉ. नागोराव कुंभार म्हणाले की, शैक्षणिक संस्थेचा विकास हा तेथील इमारती व इतर भौतिक सुविधावर अवलंबून नसून त्या संस्थेमध्ये असलेल्या प्रगल्भ अशा ग्रंथालय आणि अध्यापनाच्या सुख सोयीवर अवलंबून असते शिक्षणाच्या माध्यमातून नैतिक अध:पतन न होता माणूस घडविण्याचे पवित्र कार्य करणे अत्यंत आवश्यक आहे. महात्मा बसवेश्वरांनी आंतरिक शुद्धीकरणासाठी चोरी करू नये, हत्या करू नये, इतरांवर रागवू नये, खोटं बोलू नये, गुन्हा करू नये, इतरांना अपमानित करू नये आणि स्वतःची प्रशंशा करू नये अशी सप्तसुत्री सांगितले आहे. शिक्षण संस्थेतील संस्था पदाधिकारी प्राचार्य शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी विद्यार्थ्यांचे भविष्य घडविले पाहिजे आणि त्यांच्यावर संस्कार केले पाहिजे असेही ते म्हणाले.
यावेळी प्रसिद्ध विचारवंत माजी प्राचार्य डॉ. सोमनाथ रोडे म्हणाले की, महात्मा बसवेश्वरांनी स्थापन केलेले अनुभव मंटप हे जगातील पहिली संसद असून स्त्री पुरुष समानता, स्वातंत्र्य आणि लोकभाषेचा वापर आध्यात्मिक आणि सामाजिक प्रश्नाबाबत मुक्तचिंतन हे अनुभव मंडपात होत होते एका अर्थाने अनुभव मंडप म्हणजे तत्कालीन मुक्त विद्यापीठ होय असेही ते म्हणाले
यावेळी सत्कारमूर्ती संस्थेचे सचिव माधवराव पाटील टाकळीकर म्हणाले की, धर्मवीर देशीकेंद्र महाराजांनी श्री महात्मा बसवेश्वर शिक्षण संस्थेची मुहूर्तमेढ रोवली. शैक्षणिक संकुलामध्ये प्रत्येकाचे आचरण महत्त्वाचे आहे. महात्मा बसवेश्वरांनी कर्म सिद्धांत मांडला यामध्ये ७७० शरणांनी भाग घेतला. त्याचाच आदर्श घेऊन आम्ही लिंगायत शरण फाउंडेशनची निर्मिती करून त्याद्वारे महात्मा बसवेश्वरांचा बसवेश्वरांच्या विचाराचा प्रसार आणि प्रचार करण्याचा प्रयत्न करीत आहोत. या संस्थेचा मी सचिव असलो तरी मी एक शैक्षणिक प्रवाहातील सेवक आहे असे सांगून त्यांनी महाराष्ट्र व कामगार दिनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा दिल्या
सत्कारमूर्ती संस्थेचे अध्यक्ष आदिनाथ सांगवे म्हणाले की, शैक्षणिक संस्थेमध्ये कार्य करीत असताना नैतिक मूल्याला अधिक महत्त्व दिले पाहिजे. निष्ठा, सहभाग आणि वचनबद्धता यावर आपण अधिक कार्य केले पाहिजे. महात्मा बसवेश्वरांनी श्रमाचा विचार समाजापुढे मांडून आपले संपूर्ण जीवन समाजाप्रती समर्पित केले पाहिजे. श्रम हीच पूजा आहे असे सांगून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा अशा पद्धतीचा विचार सर्वांना दिला. आपला जन्म कशासाठी झाला यावरही आपण चिंतन केले पाहिजे. प्रत्येक दिवस हा आपला जन्मदिन असतो असे सांगून महात्मा बसवेश्वरांच्या वचनांची माहिती त्यांनी सर्वांना करून दिली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गुरु बिरादार यांनी केले तर आभार प्राचार्य डॉ. संजय गवई यांनी मानले.
या कार्यक्रमांमध्ये उपस्थित सर्वांनी संस्थेचे अध्यक्ष आदिनाथ सांगवे आणि सचिव माधवराव पाटील टाकळीकर यांच्या जन्मदिनानिमित्त त्यांचा यथोचित सत्कार केला
या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी लिंगायत शरण फाउंडेशनचे इरण्णा पावले, प्रोफेसर डॉ. सिद्राम डोंगरगे, प्रकाश बोरगावकर, महात्मा बसवेश्वर महाविद्यालय, लातूर, एम.एस.बिडवे अभियांत्रिकी महाविद्यालय, लातूर, श्री देशीकेंद्र माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, लातूर, श्री महात्मा बसवेश्वर प्राथमिक विद्यामंदिर व बालक मंदिर, लातूर, श्री शंभुलिंग शिवाचार्य माध्यमिक विद्यालय, लातूर, श्री शंभुलिंग शिवाचार्य प्राथमिक विद्यालय, लातूर, श्री निळकंठेश्वर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, लातूर, कॉलेज ऑफ फार्मसी, लातूर, अल्लमप्रभू कॉलेज ऑफ फार्मसी (बी. फार्मसी), लातूर, अभियांत्रिकी महाविद्यालय, अंबाजोगाई जी बीड, कै. पूज्य टी. बी. गिरवलकर तंत्रनिकेतन महाविद्यालय, अंबाजोगाई जी बीड येथील सर्व यूनिट प्रमुख, शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी आणि लिंगायत शरण फाउंडेशनचे सर्व पदाधिकारी यांनी परिश्रम घेतले.
या कार्यक्रमाला लातूर शहरातील बसवप्रेमी, श्री महात्मा बसवेश्वर शिक्षण संस्थेवर प्रेम करणारे सर्व मार्गदर्शक, श्री महात्मा बसवेश्वर शिक्षण संस्थेअंतर्गत चालणाऱ्या सर्व युनिट मधील सेवानिवृत्त प्राचार्य संचालक शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी आणि त्यांचा संपूर्ण परिवार, सहकारी बंधू-भगिनी, प्रिंट आणि इलेक्ट्रॉनिक मीडियाचे पत्रकार बंधू, लातूर जिल्ह्यातील सर्व संस्था पदाधिकारी, प्राचार्य, शिक्षक शिक्षकेतर बंधू-भगिनी, आजी आणि माजी विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
