लातूर :- प्रा. उन्मेष शेकडे यांच्या दहा कवितासंग्रहाचा प्रकाशन सोहळा १७ रोजी चिंचवड – पुणे येथे संपन्न झाला. महा संमेलनाध्यक्ष म. भा. चव्हाण राष्ट्रीय अध्यक्ष, प्रा. राजेंद्र सोनवणे, डॉ.अलका नाईक,डाॅ.शांताराम करंडे,ग्रामगीताचार्य,बंडोपंत बेडेकर, सुखदेव सोनवणे, प्रा.सुरेखा कटारिया, कल्पना बंब इतर सर्व मान्यवर व महाराष्ट्र राज्यातील विविध जिल्ह्यातून आलेल्या कवी व साहित्यिकांचे उपस्थित हा रेकॉर्ड प्रकाशन सोहळा संपन्न झाला.
मराठी भाषेच्या संवर्धन प्रक्रियेत लातूर जिल्हा व ढाळेगाव या खेड्याचे नाव दहा कवितासंग्रहाच्या प्रकाशन सोहळा झाल्यामुळे निश्चितच महत्त्वाचे आहे. आज मराठी भाषा हिंदी व इंग्रजी भाषेच्या दबावाखाली येत असतांना व मराठी भाषेला अभिजात मराठी भाषेचा दर्जा मिळाल्याच्या पार्श्वभूमीवर ” मायबाप “, ” वावर “, ” शेतकरी “,” ‘निलादेवी’ “,” रानमाळ “, ” रानचांदण “, “कोंबपीक”, ” तासपाणी’ “, ” रानकष्ट “, ” रानशब्द’ ” या दहा कवितासंग्रहाचा प्रकाशन सोहळा महत्त्वाचा आहे. अभिजात दर्जा मिळाल्यानंतर त्या भाषेचा प्रसार हा अधिकाधिक लोक व लोकसमूहापर्यंत होणे, भाषेचा वापर जास्तीत जास्त लोकांनी करणे, भाषेतून ग्रंथ निर्मिती होणे, अभिजात भाषा शासन व्यवहाराची होणे, लोकव्यवहारात भाषा उपयोगात येणे या विविध अंगांनी भाषेचा विकास होणे आवश्यक असते. मराठी भाषेतील प्रा. उन्मेष शेकडे यांच्या दहा कवितासंग्रहाचा प्रकाशन सोहळा यादृष्टीने महत्त्वाचा आहे. मराठी भाषेतील प्रकाशन पंरपरेत तर हा प्रा उन्मेष शेकडे यांच्या दहा कवितासंग्रहाचा प्रकाशन सोहळा महत्त्वाचा आहे.
अभिजात भाषेचा दर्जा मराठी भाषेस मिळाल्यानंतर भारत देशातील व जगातील प्रा. उन्मेष शेकडे यांचा भारताच्या साहित्य व संस्कृतिक राजधानी असलेल्या चिंचवड- पुणे येथे झालेला दहा कवितासंग्रहाचा प्रकाशन सोहळा हा एकमेव असावा.
लातूर जिल्ह्याच्या साहित्य व काव्य इतिहासातील लातूर जिल्ह्यातील प्रत्येकाला गौरव वाटावा असे हे एक गौरवाचे अक्षर पानच आहे.
विश्वाची प्रगतीच मुळात श्रम व बुध्दीवर आधारित आहे. श्रम व बुध्दी गतिशील रहाण्यासाठी अन्नाची गरज आहे. ही गरज शेतीच्या माध्यमातून पूर्ण होते. याच शेतकरी जीवनाचे कष्ट, त्यांचे जीवन, प्रश्न यांना प्रा. उन्मेष शेकडे यांच्या दहा कवितासंग्रहातील कविता शब्दबद्ध कलते.
