प्रस्तावित असलेले 22 जिल्हे नव्याने निर्माण झाले तर या गोष्टीसाठी जनता हर्षमुखाने स्वागतच करील
लातूर जिल्ह्याच्या विभाजनातून उदगीर जिल्हा नवीनच निर्माण होणार
क्षेत्रफळाने सर्वात मोठा जिल्हा म्हणून ओळख असलेला
अहमदनगर या जिल्ह्याच्या विभाजनातून संगमनेर शिर्डी आणि श्रीरामपूर हे तीन जिल्हे निर्माण होण्याच्या मार्गावर आहेत नाशिक जिल्ह्याचे विभाजन करून मालेगाव आणि कळवण हे दोन जिल्हे तयार करण्याचे प्रस्तावित आहे
नांदेड जिल्ह्याच्या विभाजनातून नवीनच किनवट हा जिल्हा करण्यासाठी प्रस्तावित आहे
ठाणे जिल्ह्याचे विभाजन करण्याची योजना असून यामधून मीरा-भाईंदर आणि कल्याण या दोन जिल्ह्यांची निर्मिती करण्याच्या गोष्टी विचाराधीन आहेत
पुणे जिल्ह्याच्या विभाजनातून नवीनच शिवनेरी हा नवीन जिल्हा तयार होऊ शकतो
ठाणे जिल्ह्यामधून तयार करण्यात आलेल्या पालघर जिल्ह्याचे देखील विभाजन होऊ शकते व या जिल्ह्यातून जव्हार हा नवीन जिल्हा तयार करण्याचे प्रस्तावित आहे

सातारा जिल्ह्याच्या विभाजनातून माणदेश जिल्ह्यात तयार केला जाण्याचे प्रस्तावित आहे
रायगड मधून महाड जिल्हा तयार केला जाण्याचे प्रस्तावित आहे
बीड जिल्ह्याच्या विभाजनातून नवीनच अंबेजोगाई हा जिल्हा तयार करण्याचे नियोजनात आहे
रत्नागिरी मधून मानगड जिल्हा तयार करण्याचे नियोजन आहे
चंद्रपूर या जिल्ह्याचे विभाजन करून चिमूर हा जिल्हा नवीनच करण्याचे नियोजन आहे
गडचिरोली जिल्ह्याच्या विभाजनातून अहेरी हा जिल्हा होऊ शकतो
जळगाव जिल्ह्याचे विभाजन करून भुसावळ जिल्हा तयार करण्याचे प्रस्तावित आहे
बुलढाणा जिल्ह्यातून खामगाव जिल्हा तयार होऊ शकतो
भंडारा जिल्ह्याच्या विभाजनातून साकोली हा नवीन जिल्हा तयार करण्याचा संकल्प आहे
अमरावती जिल्ह्याचे विभाजन करून अचलपूर हा नवीन जिल्हा निर्माण होऊ शकतो
यवतमाळ जिल्ह्याचे विभाजन करून पुसद हा नवीन जिल्हा तयार करण्याचे प्रस्तावित आहे
या पद्धतीने नवीन जिल्हे तयार झाल्यास जनतेची काहीच हरकत राहणार नाही पण मराठी जनतेची मागणी नसताना मराठी प्रदेशाची फाळणी करणे वेगळ्या विदर्भाचा प्रस्ताव काल्पनिक विचारधारेच्या तत्त्वाचा आधार घेऊन मराठी संस्कृतीचे विभाजन करणे हे मराठी भाषिकावर मराठी संस्कृती वरती खूप मोठा अन्याय केल्यासारखे होईल कारण महाराष्ट्र निर्मितीच्या वेळेसच महाराष्ट्रावर खूप मोठा अन्याय त्यावेळेस करण्यात आलेला आहे महाराष्ट्राच्या सीमावरती भागात कितीतरी खेडेगावे अशा प्रकारचे आहेत की त्यांना महाराष्ट्रात यायचे आहे पण त्यांना घेण्यासाठी महाराष्ट्र शासनाची त्यांच्या बदल असलेली उदासीनता हे कारण आड येत आहे आणि त्या ठिकाणचे महाराष्ट्राच्या शेजारचे राज्य त्यांना येऊ देत नाही आणि त्या ठिकाणी त्यांना न्यायही मिळवून देत नाही त्या ठिकाणी त्यांना अल्पसंख्यांकांचे जीवन जगावे लागत आहे हा महाराष्ट्र निर्मितीच्या वेळेस त्यांच्यावरती खूप मोठा अन्याय झाला जगाच्या नकाशामध्ये आपल्या देशावर म्हणजेच भारत देशावर सीमा निश्चिती करत असताना शेजाऱ्याच्या इच्छेनुसार आपल्या सीमा निश्चित करण्यात आल्या आणि अगदी त्याचप्रमाणे महाराष्ट्रावर सुद्धा तसाच अन्याय झाला महाराष्ट्र निर्मितीच्या वेळेस शेजारच्या राज्यांना नाराज न करता किंवा त्या ठिकाणच्या मराठी भाषिक लोकांचा विचार न करताच महाराष्ट्राच्या सीमा निर्माण झाल्या हा खूप मोठा अन्याय इतिहासाला न विसरता येणारा घडून गेला आणि त्या अन्यायाच्या जखमा अजून भरण्याच्या अगोदरच दुसरी फार मोठी जखम करण्याचा प्रयत्न झाल्यास ते महाराष्ट्राची जनता सहन करणार नाही हे मात्र खरे
वेगळा विदर्भ व्हावा हे मराठी माणसाला कधीही वाटत नाही आपला मराठी माणूस आपल्यापासून दूर जावा असे मराठी माणसाला आजपर्यंत कधीही वाटलेले नाही पण मूठभर राजकीय चेहरे मात्र हा प्रश्न नसलेला प्रश्न निर्माण करून तो जिवंत कसा ठेवता येईल त्या प्रश्नाला मसाला कसा लावता येईल आणि त्या ठिकाणचे राजकारण त्या प्रश्नाच्या भोवती कसे फिरवता येईल असा त्यांच्याकडून सातत्याने प्रयत्न केला जातो
संघराज्य शासन पद्धतीमध्ये घटक राज्याच्या निर्मितीसाठी 1921 मध्ये नागपूरच्या अधिवेशनात महात्मा गांधींनी भाषावार प्रांत रचना हा प्रस्ताव मांडला आणि त्याप्रमाणे वेगवेगळे राज्य निर्मितीसाठी यांच्याकडून करण्यात आलेला शब्दप्रयोग म्हणजे भाषावार प्रांत रचना हा होय आणि यांच्या म्हणण्यानुसार राज्य निर्मितीसाठी हा सर्वात मोठा आधार ठरला आणि केवळ या आधारावरच हिंदी भाषिक प्रदेश वगळता इतर प्रादेश एका भाषेचे एक राज्य निर्माण करण्यात यावे असे त्यावेळेस ठरलेले होते आणि ते योग्यही आहे पण महाराष्ट्राच्या बाबतीत या ठिकाणी शुद्ध स्वरूपात अन्याय झाल्यासारखा दिसतो मराठी भाषिक गोवा हा महाराष्ट्रात असायला पाहिजे पण त्यास वेगळ्या राज्याचा दर्जा देऊन त्यास वेगळं ठेवण्यात आले आणि त्या गोव्याकडे आपला मराठी माणूस अशा प्रकारच्या नजरेने पाहतो की पाकिस्तान कडे असलेल्या कश्मीरच्या भागाकडे जसे आपण हिंदुस्तानी व्यक्ती पाहतो त्या पद्धतीने आज मराठी माणूस एकेकाळी महाराष्ट्राचा मराठी भाग म्हणून ओळखला जाणारा गोवा त्याकडे आज पाहतो आणि आता जनतेचा कसलाही आवाज नसताना देखील प्रत्येक निवडणुकीच्या वेळेस विदर्भाचा विषय हा जाणीवपूर्वक चर्चेला घेतला जातो कदाचित यांचा विचार हा मराठी माणसावरती सूड काढण्याचा तरी नसावा असा प्रश्न कधी कधी मराठी माणसाच्या मनात खेळून जातो
जर एखाद्या राज्याच्या विभाजनाच्या मार्गाने जर त्या राज्याचा विकास होतो अशा प्रकारचा जर त्यांचा भ्रम असेल तर तो पूर्णतः चुकीचा आहे आपल्याच देशात असे अनेक राज्य आहेत विदर्भापेक्षाही खूप लहान आहेत मग त्यांचा विकास हा महाराष्ट्रापेक्षा अधिक असायला पाहिजे पण तसे अजिबात दिसत नाही आणि दिसणारही नाही आपल्याच देशातले सेवन सिस्टर म्हणून ओळखले जाणारे पूर्वांचल मधील अरुणाचल प्रदेश आसाम नागालँड मणिपूर मेघालय त्रिपुरा मिझोराम आणि या सोबतच सिक्कीम सुद्धा हे सर्व अतिशय छोटे राज्य आहेत
पूर्वेकडील हे सर्व राज्य ते महाराष्ट्रापेक्षा खूपच लहान आहेत पण महाराष्ट्रा इतके प्रगत नाहीत आर्थिक दृष्ट्या सक्षम ही नाहीत आणि त्यांच्यात एकमेकाबद्दल विश्वास आणि आदर हा सुद्धा शिल्लक राहिलेला नाही त्या ठिकाणच्या त्यांच्या विभाजनामुळे त्या ठिकाणी अनेक प्रादेशिक वाद स्थलांतरिताचा वाद अवैध घुसखोरांचा वाद अशा प्रकारचे अनेक नको असलेले वाद या ठिकाणी निर्माण होऊन बसले आणि याचप्रमाणे आफ्रिका खंडातील अनेक देश असे आहेत की आकाराने खूप लहान आहेत पण त्यांचा विकास म्हणावा तसा जगाच्या इतर भागाच्या तुलनेत खूपच मागे असलेला दिसून येतो हिंदी महासागरात असलेले आपलेच महासागरीय बेटे अंदमान निकोबार हे आकाराने खूप लहान आहेत मग त्यांचा विकास का नाही झाला हेही आपल्याला या ठिकाणी पहावे लागेल म्हणजे या ठिकाणी आपल्याला असे दिसून येते की वेगळ्या विदर्भ राज्याचे महाराष्ट्रापासूनचे विभाजन हे आर्थिक विकासासाठी विभाजन नाही तर ते राजकीय डावपेचा साठी विदर्भाचा प्रश्न खेळवला जातो आणि या मार्गाने जर खेळवता खेळवता विदर्भ वेगळाच झाला तर महाराष्ट्रापेक्षा वैदर्भीय मराठी जनतेवरती तो आतापर्यंतच्या इतिहासातील सर्वात मोठा अन्याय घडेल हे मात्र खरे आणि या गोष्टीचा विदर्भातील जनतेने यापूर्वीच अभ्यास केलेला खूप छान राहील त्यांच्या तो हिताचाही राहील असे याबद्दल मला या ठिकाणी वाटते

राजनारायण बिरादार, लातूर