दीड-दोन महिन्याच्या निवडणुकीच्या रणधुमाळीनंतर नरेंद्र मोदी विवेकानंद शीला स्मारक कन्याकुमारी येथे ध्यान साधना करण्यासाठी पोहोचले. भारताचे पंतप्रधान यांचे पहिले नाव नरेंद्र आणि विवेकानंदाचे विवेक जागृत होण्यापूर्वीचे नाव नरेंद्र दत्त असे होते. हा निव्वळ योगायोग आहे. 1882 साली स्वामी विवेकानंद कन्याकुमारी येथील विशाल शिळेवरती ध्यान साधना करत असताना जीवनाचे लक्ष व मोक्ष प्राप्तीचे मार्ग शोधात असताना त्यांना ईश्वरांचा आशीर्वाद प्राप्त झाला. ध्यान साधना प्राप्तीनंतर दुसऱ्या वर्षी म्हणजेच 1883 साली अमेरिकेत शिकागो येथील धर्म परिषद येथे आपले तेजस्वी विचार मांडून भारताचे नाव संपूर्ण जगात उज्वल केले. नरेंद्र मोदी यांच्या ध्यान साधनेमुळे विरोधी पक्ष परेशान झाला आहे . विरोधी पक्षांना वाटते एक तारखेला शेवटच्या फेरीत होणाऱ्या मतदानावरती नरेंद्र मोदींच्या ध्यान साधनेमुळे हिंदू मताचे ध्रुवीकरण होईल. विरोधी पक्ष अध्यात्म, धर्म आणि राजकारण याची गल्लत करत आहेत. अध्यात्म केवळ जगाच्या कल्याणाच्या मार्ग दाखवत असतो, धर्म अधर्माच्या मार्गापासून रोखत असतो आणि राजकारण हे सर्व जनतेच्या कल्याणासाठी योजना राबवण्यासाठी माध्यम आहे.
नरेंद्र मोदी यांचा विवेक तर जागृतच आहे आणि साधना केल्यामुळे विकसित भारतासाठी कार्य करण्यासाठी त्यांना ईश्वराकडून अधिक बळ आणि ऊर्जा प्राप्त होत असेल तर विरोधी पक्षांना हरकत घेण्याचे कारण नाही. विरोधी पक्षाने सुद्धा ध्यान साधना करण्यासाठी भारतात कोणतेही स्थळ निवडावे यावर कोणाचेही बंधन नसणार. राहुल गांधी कर्नाटकामध्ये निवडणुकीच्या वेळी विभूतेचे तीन पट्टे आणि कपाळावर कुंकू लावलेला दाढी सहित असलेला फोटो फार मोठ्या प्रमाणात प्रसारित होत होता त्यावर कोणीही हरकत घेतलेली नव्हती. निवडणुकीच्या काळात राहुल गांधी मंदिर ,मज्जिद आणि गिरीजाघर या ठिकाणी जात नव्हते का ? हिंदू लोक मंदिरामध्ये मुली छेडण्यासाठी जात असतात असे राहुल गांधीनी म्हटले होते हे आपण सर्वजण सोयीस्करपणे विसरलो काय?. मग राहुल गांधी आत्ता मंदिरात फेऱ्या कशासाठी मारतात. मंदिरात देव असतो की नाही या वादात मला पडायचे नाही ज्याच्या त्याच्या आस्थेचा विषय आहे पण अशा ठिकाणी गेल्याने माणसाच्या मनावरती निश्चितच वेगळा प्रभाव पडतो. हे संकरित लोकांना काय कळणार संत नामदेव लहान असताना पंढरीच्या पांडुरंगाला नैवेद्य खाऊ घातल्याचे आपण भक्त विजय कथासार या ग्रंथात वाचलेले आहे. संत दामाजीपंतवरील आरिष्ट टाळण्यासाठी पांडुरंग विठ्या महाराचे रूप घेतलेले होते. संत गोरा कुंभार यांचे चिखलात तुडवलेला मुलगा पांडुरंगाच्या कृपेने त्यांना पुन्हा प्राप्त झाला होता. महाराष्ट्रातील साधुसंताचे चरित्र त्यांचे साधना व त्यांनी केलेले कार्य याबद्दल माझे वाचन झालेले आहे. साधुसंताची साधना म्हणजे आत्मा आणि परमात्मा यांना जोडणारा दुवा आहे असे मी समजेन.
भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी गेल्या दहा वर्षाच्या काळात भारताला शक्तिशाली राष्ट्र कसे घडवता येते हे दाखवून दिले . परराष्ट्र निती मध्ये महत्त्वाचे बदल घडवून आणले. रशिया आणि अमेरिका परस्पर विरोधी शत्रुराष्ट्र असले तरी दोन्ही राष्ट्रा बरोबर मैत्रीचे संबंध जोपासून भारताला दोन्हीकडून फायदा मिळवून घेतले. इराण आणि अमेरिका यांचे वितुष्ट असताना इराण भारताचा मित्र आहे आठ ते दहा मुस्लिम राष्ट्राकडून सर्वोच्च नागरी सन्मान नरेंद्र मोदींना यांना मिळालेला आहे. हिंदू आणि मुसलमान याचे राजकारणमध्ये विरोधी पक्ष करत असून त्याचा दोष नरेंद्र मोदीच्या माथी मारत आहे आहेत. राजीव गांधीच्या काळात सुप्रीम कोर्टाकडून 62 वर्षीय शहाबानोला मिळालेला न्याय परत फिरवला केवळ मुस्लिम वोट बँकेवरती परिणाम होईल म्हणून राजीव गांधीनी 414 खासदार संख्याबळ असताना माघार घेतली. ट्रिपल तलाक कायद्याला हात घालण्याचे धाडस केवळ नरेंद्र मोदींनीच केले हे केवळ वोट बँकेसाठी नव्हे तर मुस्लिम स्त्रियाना सन्मानजनक वागणूक मिळावी म्हणून. येणाऱ्या काळात नरेंद्र मोदी संपूर्ण भारत आणि जग यांच्या कल्याणासाठी करत असलेले कार्य अधिक जोमाने पुढे नेतील याची आम्हाला तीळ मात्र शंका नाही.

अशोक सज्जनशेट्टी वलांडीकर,
पुणे