लातूर : शिक्षण, आरोग्य क्षेत्रात गरजूंना सदैव मदतीचा हात देणाऱ्या लातूर येथील दिशा प्रतिष्ठानच्या पाचव्या वर्धापनदिनानिमित्त दिशा शस्त्रक्रिया योजना उपक्रम 21 मार्च ते 21 एप्रिल 2025 दरम्यान राबविण्यात येणार आहे. ज्या रुग्णाना शस्त्रकिया करायला सांगितले आहे पण आर्थिक परिस्थिति नसल्यामुळे ते करु शकत नाहीत अशा रुग्णानी या योजनेचा लाभ घ्यावा.
यात ॲन्जिओप्लास्टी, कॅन्सर, प्रोस्टेट ग्रंथी, मुतखडा, मणक्याचे आजार, ब्रेन ट्युमर, गादी सरकणे आदी आजारांवर औषधांसह मोफत शस्त्रक्रिया केल्या जाणार असल्याची माहिती दिशा प्रतिष्ठानच्या वतीने देण्यात आली आहे.
दिशा शस्त्रक्रिया योजनेतून हाडांच्या शस्त्रक्रिया त्यात खुब्बा, गुडघा, कृत्रिम सांधेरोपण, फ्रोझन शोल्डर, टेनिस एल्बो यावर इंजेक्शन थेरपी, लिंगामेंट दुखापत शस्त्रक्रिया केली जाईल. डोळ्यांचे बिनटाक्याचे मोतीबिंदू, डोळ्यावरील पडदा काढणे, काळे बुबुळ बदलण्याची शस्त्रक्रिया, औषधी व कृत्रिम भिंगारोपण केले जाईल. तसेच कानाचा पडदा, नाकातील वाढलेले हाढ, घशाचे टौन्सिल्स, दुर्बिनीतून लासरूनीची शस्त्रक्रिया, स्वरयंत्र, कान, नाकाची दुर्बिनीद्वारे तपासणी. जनरल सर्जरीत हायड्रोसिन, खतना, हरनिया, मुळव्याध, शरीररातल चरबीच्या गाठी. स्त्रीरोग शस्त्रक्रियेत स्तनातील, गर्भाशय, अंडाशयाच्या गाठी आदी शस्त्रक्रिया केल्या जाणार आहेत. यासाठी मात्र ५० टक्के खर्च दिशा प्रतिष्ठानकडून केला जाणार असून, उर्वरित ५० टक्के खर्च रूग्णांना करावा लागणार आहे.
गरजूंनी नाव नोंदणीसाठी दिशा प्रतिष्ठानच्या जिल्हा क्रीडा संकुलातील कार्यालयात सकाळी १० ते दुपारी २ या वेळेत संपर्क करावा. योजनेचा लाभ २१ मार्च ते २१ एप्रिल २०२५ पर्यंत घेता येईल.
अधिक माहितीसाठी दिशा प्रतिष्ठानचे अभिजीत देशमुख, सोनू डगवाले, इसरार सगरे, ॲड. वैशाली जाधव, जब्बार पठाण, विष्णू धायगुडे, अजय शहा यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन प्रतिष्ठानच्या वतीने करण्यात आले आहे.
नामांकित रूग्णालयात होणार शस्त्रक्रिया…
लातूर शहरातील सह्याद्री हॉस्पिटल, पोतदार हॉस्पिटल, काळे हॉस्पिटल, गोरे हॉस्पिटल, सदासुख हॉस्पिटल, सिग्मा आय हॉस्पिटल, दत्तकृपा नेत्रालय या नामांकित रूग्णालयात रूग्णांच्या शस्त्रक्रिया केल्या जाणार आहेत. यासाठी रूग्णांनी जुने रिपोर्ट, आधार कार्ड, रेशन कार्ड सोबत आणणे आवश्यक आहे. तसेच सह्याद्री हॉस्पिटल, निदान डायग्नोसिस सेंटर, ओम साई लॅब येथे रक्त, सिटीस्कॅन, एमआरआयवर ५० टक्के सवलत दिली जाणार आहे.
