29.5 C
New York
Sunday, July 6, 2025

दिव्यांगाच्या राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धेत लातूरला 18 पदके

लातूर :- दिव्यांग कल्याण आयुक्तालय पुणे, क्रीडा व युवक कल्याण सेवा संचालनालय व स्व.प्रभाकरराव दटके स्मृती सेवा संस्था नागपूर यांच्या संयुक्त विद्यमाने रेशीमबाग मैदान नागपूर येथे झालेल्या दिव्यांग विद्यार्थ्यांच्या राज्यस्तरीय स्पर्धेत लातूरच्या दिव्यांग खेळाडूंनी 18 पदके पटकावीत घवघवीत यश संपादन केले. यात 08 सुवर्ण, 07 रौप्य, व 03 कास्यपदाकांचा समावेश आहे.
या राज्यस्तरीय स्पर्धेत लातूर जिल्ह्यातील जवळपास 15 दिव्यांग विशेष शाळांतील 60 विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवीला होता यात मुकबधिर, मतिमंद, अस्थिव्यंग, अंध व बहूविकलांग प्रवर्गाचा समावेश होता. यात हर्षवर्धन रणखांब – सॉप्टबॉल सुवर्णपदक (संत बापुदेव साधू निवासी मतिमंद विद्यालय, लातूर), अभिषेक बंडगर – 200 मी धावणे कास्यपदक (निवासी अपंग कार्यशाळा चाकूर), ज्ञानेश्वर कपासे – 200 मी धावणे सुवर्णपदक, कलीम शेख – व्हिलचेअर वर बसून गोळा फेक, रौप्यपदक ( निवासी अस्थिव्यंग कर्मशाळा, उदगीर), गोविंद भांगे – 100 मी धावणे सुवर्णपदक, सादीया शेख – 50 मी धावणे रौप्यपदक (सुआश्रय निवासी अपंग विद्यालय, लातूर), दिव्यां मोठे- 50 मी धावणे सुवर्णपदक, 100 मी धावणे कास्यपदक, (निवासी अपंग विद्यालय, अहमदपूर) हरिश पुरी – गोळा फेक सुवर्णपदक, 100 मी धावणे रौप्यपदक, रवि कवठे – गोळा फेक सुवर्णपदक, राजू पवार – 200 मी धावणे रौप्यपदक, दर्शन मोरे – 200 मी धावणे कास्यपदक (संत गाडगेबाबा अनाथ मतिमंद मुलांचे बालगृह लातूर), मानवी पाटील – 25 मी चालणे सुवर्णपदक, वैष्णवी गोणे – बादलीत बॉल टाकणे रौप्यपदक, सुमेधा देशमुख – 25 मी चालणे सुवर्णपदक, आदिनाथ सलगर – गोळा फेक रौप्यपदक (संवेदना विद्यालय व औद्योगिक प्रशिक्षण संस्था लातूर), लक्ष्मण म्हात्रे – 50 मी धावणे रौप्यपदक (एम.ए.बी अंध विद्यालय, उदगीर).

मुख्य कार्यकारी अधिकारी राहूलकुमार मीना यांच्याकडून कौतुक
जिल्हा परिषचे मुख्य कार्यकारी अधिकारी, राहूलकुमार मीना यांनी जिल्ह्यातील या विजेत्या दिव्यांग खेळाडूंचे कौतुक केले. यासह समाज कल्याणचे प्रादेशिक उपायुक्त अविनाश देवसटवार, जिल्हा समाज कल्याण अधिकारी, संतोषकुमार नाईकवाडी, वैद्यकिय सामाजिक कार्यकर्ता राजू गायकवाड, सहाय्यक सल्लागार बाळासाहेब वाकडे, क्रीडा शिक्षक महेश पाळणे, तुकाराम सिरसाठ, अण्णासाहेब कदम, व्यंकट लामजणे, तुकाराम यलमटे, प्रशांत चामे, रामनारायण भुतडा, भरत देवकते, परमेश्वर पाटील, इमरान पठाण, बस्वराज रोट्टे, प्रसाद औरादे, प्रवीण सुरनर, शहाजी बनसोडे यांनी ही विजेत्या खेळाडूंचा गौरव केला.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles