लातूर :भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार बोधिसत्व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या क्रांती भूमीवर म्हणजेच कसबे तडवळे येथे सामूहिक बुद्ध वंदना संपन्न झाली.
बुद्ध विहार विकास निर्मिती तथा समाजातील उपासक उपासिका, तरुण वर्गात धम्म संस्कार रुजवीण्यासाठी पु. भंतेजी पय्यानंद थेरो यांच्या मार्गदर्शन खाली “दर रविवार चलो बुद्ध विहार” अभियान अंतर्गत ३९ वी सामूहिक बुद्ध वंदना कसबे तडवळे स्थित “वैशाली बुद्ध विहार” भिम नगर येथे संपन्न झाली.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी २२ आणि २३ फेब्रुवारी १९४१ रोजी कसबे तडवळे (धाराशिव) येथे दोन दिवसीय मांग-महार वतन परिषद घेऊन खूप मोठी सामाजिक क्रांती घडवून आणली होती. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी कोणत्याही एका जातीसाठी लढा दिला नसून, समूळ जातीअंतासाठी आयुष्यभर लढा दिला आहे हे आपण विसरता कामा नये, समाजात एकी असावी बेकी नसावी, समाजातील सर्वांनी मिळून धार्मिक चळवळ पुढे न्यावी असे प्रतिपादन भिक्खु पय्यानंद थेरो यांनी यावेळी केले.
कार्यक्रमाच्या सुरुवातीस सर्व महामानवांच्या प्रतिमेंना पुष्पाने, धुपाने तथा दीपाने वंदन करण्यात आले, त्रिरत्न वंदनेनंतर, उपस्थित सर्वांचे स्वागत करण्यात आले.
कार्यक्रमाचे प्रस्तविक डॉ. अरुण कांबळे यांनी केले तसेच कसबे तडवळे येथील ऐतिहासिक पार्श्वभूमी व स्मारकासंबंधीतील माहिती तसेच या अभियानाबद्दलचे मार्गदर्शन आनंद सोनटक्के व तेजेस भालेराव यांनी केले.
सूत्रसंचालन मिलिंद धावारे यांनी केले तर आभार जयशील भालेराव यांनी मानले.
कार्यक्रम यशस्वीतेसाठी दत्तात्रय निकाळजे, तेजेस भालेराव, प्रसेनजीत सोनवणे, जगन्नाथ भालेराव, दत्ता निकाळजे, चंदू भालेराव, धनाजी भालेराव, मारूती सोनवणे, हेमंत निकाळजे, सुर्यचंद्र सोनवणे, समाधान भालेराव, लक्ष्मण सोनवणे, सुरज भालेराव, बाबा भालेराव, दुशांत सोनवणे, सुधाकर निकाळजे, स्वप्नील भालेराव, प्रतिश भालेराव, चंद्रकांत बनसोडे, सिंबा हिंगे, दिपक निकाळजे, सुधाकर जानराव, वामन सोनवणे, विलास भालेराव, संताजी निकाळजे, संजय भालेराव, भाऊराव सोनवणे, वैभव भालेराव, अजित निकाळजे, गंगाधर सोनवणे, अमित ढावारे, बबलू भालेराव, विपूल भालेराव, सारिपुत्र भालेराव, सतीश निकाळजे, पराज सोनवणे, शंकर भालेराव, महात्माजी काकडे, अतूल सोनटक्के, नंदू सोनवणे, भारत भालेराव, सुधीर निकाळजे सोपान निकाळजे आदींनी परिश्रम घेतले.
या कार्यक्रमासाठी बौद्ध उपासक, उपासिका तसेच बालक, बालीका यांची उपस्थिती मोठ्या संख्येने होती.
