जिल्हाभरातील विविध महाविद्यालयातून 306 स्पर्धेकांचा सहभाग
लातूर : स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड यांच्या वतीने आविष्कार स्पर्धा संपन्न होते आहे. लातूर जिल्हास्तरीय स्पर्धा आयोजन करण्याची जबाबदारी दयानंद वाणिज्य महाविद्यालयावर सोपविण्यात आली होती. शनिवार दि. 4 ऑक्टोबर रोजी महाविद्यालयात ही स्पर्धा संपन्न झाली. या स्पर्धेत लातूर जिल्ह्यातील विविध महाविद्यालयातून 306 विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद नोंदवला.
स्पर्धेचे उदघाटन दयानंद शिक्षण संस्थेचे संयुक्त सचिव विशाल लाहोटी यांच्या हस्ते झाले. अध्यक्षस्थानी संस्था सदस्य विशाल अग्रवाल होते. यावेळी मंचावर विद्यापीठाचे आविष्कार नोडल ऑफिसर डॉ. शैलेश वाढेर, डॉ. काशिनाथ बोगले, व्यवस्थापन सदस्य डॉ. संतराम मुंडे, डॉ. हेमलता भोसले, डॉ. आशिष गुळवे, सिनेट सदस्य धनराज जोशी, डॉ. महेश बेंबडे, बी.एस. सुरवसे, प्राचार्य डॉ. प्रशांत मान्नीकर, उपप्रचार्य डॉ. गणेश लहाने, डॉ. बाळासाहेब चव्हाण, आविष्कार जिल्हा समन्वयक प्रा.अक्षय पवार आदींची उपस्थिती होती. दरम्यान, आविष्कार स्पर्धेदरम्यान दयानंद शिक्षण संस्थेचे अध्यक्ष लक्ष्मीरमण लाहोटी, सचिव रमेश बियाणी, सदस्य बालकिशन बांगड, एडीओ डॉ. जयप्रकाश दरगड यांनी भेट देऊन सहभागी स्पर्धकांचे मनोबल वाढवले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. आकांक्षा भांजी यांनी तर शेवटी आभार प्रा. स्वप्नाली शरणार्थी यांनी मानले. अध्यक्षीय भाषणात बोलताना विशाल अग्रवाल म्हणाले, दयानंद शिक्षण संस्था नेहमीच विद्यार्थ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभी आहे. आज देशाला आणि जगाला नव्या संशोधनाची गरज आहे. उदघाटक म्हणून बोलताना विशाल लाहोटी म्हणाले, विद्यार्थ्यांनी संशोधनाकडे वळले पाहिजे.
विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद…
आविष्कार या स्पर्धेत जिल्ह्यातील विविध महाविद्यालयातून एकूण 306 विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला. एकूण 6 विविध विद्याशाखात ही स्पर्धा झाली. या स्पर्धेतून पुढे विद्यार्थी विद्यापीठ आणि राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवडले जाणार आहेत. अनेक नावीन्यपूर्ण गोष्टी विद्यार्थ्यांनी स्पर्धेत मांडल्या. ही स्पर्धा आयोजित करण्याची संधी दयानंद वाणिज्य महाविद्यालयाला दिल्याबद्दल प्राचार्य डॉ. प्रशांत मान्नीकर आणि जिल्हा समन्वयक प्रा. अक्षय पवार यांनी विद्यापीठ प्रशासनाचे आभार मानले. दरम्यान, संस्थेचे अध्यक्ष लक्ष्मीरमण लाहोटी आणि सचिव रमेश बियाणी यांनीही स्पर्धे दरम्यान भेट देऊन विद्यार्थ्यांना प्रोत्साहन दिले.




