पत्नीच्या चारित्र्यावर संशय –पतीने साथीदारांसह केला खून
लातूर, शहर प्रतिनिधी : तिरू नदीच्या पात्रात सुटकेसमध्ये सापडलेल्या अज्ञात महिलेच्या खुनाचा लातूर पोलिसांनी अवघ्या काही दिवसांत उलगडा करत गुन्ह्यातील पाच आरोपींना अटक केली आहे. पोलिसांच्या तपासातील ही मोठी कामगिरी असून आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिली आहे. २४ ऑगस्ट रोजी चाकूर–शेळगाव फाटा मार्गावरील पुलाखाली सुटकेसमध्ये सापडलेल्या महिलेचा मृतदेह पूर्णतः कुजलेल्या अवस्थेत असल्याने ओळख पटवणे अवघड झाले होते. पोलिसांनी घटनास्थळावरील ट्रॉली बॅग, अंतर्वस्त्र, जर्किन, बांगडी, कानातील दागिने आदी पुरावे तपासून विविध पथके तयार केली. तब्बल ३०० मिसिंग महिलांची चौकशी, सीमावर्ती जिल्ह्यांतील तपासणी, सीसीटीव्ही फुटेज, सोशल मीडियावरील माहिती अशा सर्व अंगांनी तपास सुरू करण्यात आला.तपासादरम्यान मृत महिलेची ओळख फरीदा खातून (वय २३, रा. उत्तर प्रदेश) अशी पटली. तिचा पती जीया उल हक याला फरीदाचे परपुरुषाशी संबंध असल्याचा संशय होता. १५ ऑगस्ट रोजी त्याने साथीदारांच्या मदतीने पत्नीचा गळा आवळून खून केला व मृतदेह सुटकेसमध्ये भरून नदीत फेकून दिला. पोलिसांनी संशयित हालचालींवर लक्ष ठेवताच जीया उल हक स्वतःच मिसिंग दाखल करण्यासाठी उदगीर ग्रामीण पोलीस ठाण्यात आल्याने संशय बळावला आणि चौकशीत त्याने गुन्ह्याची कबुली दिली.अटक आरोपी :जीया उल हक (३४)सज्जाद जरूल अन्सारी (१९)अरबाज जमलू अन्सारी (१९) – सर्व रा. बडा सिक्किटा, जि. कुशीनगर, उत्तर प्रदेशसाकीर इब्राहिम अन्सारी (२४) – रा. विजयपूर, जि. कुशीनगरआजम अली सजवाल अली उर्फ गुड्डू (१९) – रा. विजयपूर, जि. कुशीनगरसर्व आरोपींना न्यायालयात हजर केले असता पाच दिवसांची पोलीस कोठडी मिळाली आहे.ही कारवाई पोलीस अधीक्षक अमोल तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली अपर पोलीस अधीक्षक मंगेश चव्हाण, उपविभागीय अधिकारी अरविंद रायबोले, गजानन भातलवंडे तसेच स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सुधाकर बावकर, वाढवणा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील गायकवाड, चाकूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक बालाजी भंडे, उदगीर ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राजकुमार पुजारी, स्थानिक गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक माणिक डोके, सदानंद भुजबळ, पोलीस उपनिरीक्षक राजाभाऊ घाडगे, तसेच पोलीस ठाणे उदगीर ग्रामीणचे पोलीस उपनिरीक्षक देवकर, पोलीस अमलदार नामदेव चेवले , राजकुमार डबेटवार, सचिन नाडागुडे, महेबूब सय्यद, युवराज जाधव, राजकुमार देवडे , संदीप केंद्रे, राम बनसोडे, रवी चिमुले, तसेच स्थानिक गुन्हे शाखेचे सफौ सर्जेराव जगताप, पोलीस अंमलदार युवराज गिरी, राजेश कंचे, रियाज सौदागर, विनोद चलवाड, साहेबराव हाके, अर्जुन रजपूत, संजय कांबळे, सुरेश कलमे, दिनेश देवकते, सिद्धेश्वर मदने, गणेश साठे, मनोज खोसे, तुळशीराम बरुरे, पाराजी पुठेवाड, जमीर शेख, बंडू नीटूरे, चंद्रकांत केंद्रे, प्रदीप चोपणे सायबर सेलचे पोलीस अंमलदार शैलेश सुडे यांनी केली. सदर गुन्ह्यातील उत्कृष्ट तपासासाठी मा. पोलीस उप-महानिरीक्षक, नांदेड परिक्षेत्र यांनी पथकाला २५ हजार रुपये बक्षीस जाहीर केले असल्याचे पोलिस अधीक्षक अमोल तांबे यांनी सांिगतले.





