लातूर : लातूर येथील अवंती नगरातील डी.एम. ज्युनिअर कॉलेज चा महाराष्ट्र माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने घेण्यात आलेल्या 12 वी बोर्ड परीक्षेत कला, वाणिज्य व विज्ञान शाखेचा निकाल 96% लागला असून दरवर्षीप्रमाणे या ही वर्षी कॉलेजने यशाची परंपरा कायम राहिली आहे.
कॉलेज मधील विज्ञान शाखेचा निकाल 96% लागला असून विज्ञान शाखेतून सर्वप्रथम कानडे गौरवी (80%) व देशमुख अनुष्का (80%) तर द्वितीय नार्वेकर ओम (75%) आणि तृतीय पाटील श्रीवर्धन (74%) व वाणिज्य शाखेचा 94% निकाल लागला असून वाणिज्य शाखेतून सर्वप्रथम रोंगे चैतन्या (81%), द्वितीय अवधूत साक्षी (70%), तृतीय कोमटवाड माऊली (66%) व कला शाखेचा निकाल 60% लागला असून कला शाखेतून सर्वप्रथम चव्हाण निकिता (65%), द्वितीय कांबळे अंकिता (59%), आणि बस्तापुरे निकिता (57%) यांनी तृतीय क्रमांक प्राप्त केला आहे.
कॉलेजमधील सर्व यशस्वी व गुणवंत विध्यार्थ्यांचा सत्कार संस्थेचे संस्था सचिव कालिदासजी माने यांच्या शुभहस्ते तर संस्थेचे प्रशासकीय अधिकारी जी. टी. माने यांच्या अध्यक्षतेखाली व संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मनोज माने , विलासराव देशमुख कनिष्ठ महाविद्यायालयाचे प्राचार्य विवेक माने व डी. एम. कॉलेजचे प्राचार्य चव्हाण एस.एस. यांच्या उपस्थिती मध्ये संपन्न झाला. यावेळी कॉलेज मधून प्रथम, द्वितीय व तृतीय आलेल्या विध्यार्थ्यांचा व त्यांच्या पालकांचा सत्कार पुष्पहार व पुष्पगुच्छ देऊन करण्यात आला.
कायक्रमाचे सूत्रसंचालन सूर्यवंशी ए.डी. यांनी केले तर आभार कॉलेज चे प्राचार्य चव्हाण एस.एस. यांनी मानले. या प्रसंगी मोठ्या प्रमाणात पालक वर्ग उपस्थित होता. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी कॉलेज मधील सर्व प्राध्यापक श्रीमती थोरात व्ही. एस. कांबळे एस.व्ही., बुरशे बी.एस., भोसले व्ही.ए., माळी बी.के., बोधणे एस.बी., शेख एस.ए., माने एस.बी., बामणकर पी.सी., आणि शिक्षकेत्तर कर्मचारी पवार डी.के. जाधव एस.एम., जाधव डी.जे., पांचाळ दिग्विजय, सुडे आर.पी., हेडे ए.एस. यांनी प्रयत्न केले.
