लातूर – अहमदपूर तालुक्यातील खंडाळा येथील जिल्हा परिषद माजी सदस्य माधवराव जाधव यांनी आपल्या समर्थकांसह बुधवारी शरदचंद्र पवार, प्रांताध्यक्ष आ.जयंतराव पाटील यांच्या हस्ते व मान्यवरांचा उपस्थित राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षात मुंबई येथील पक्ष कार्यालयात पक्ष प्रवेश केला. याप्रसंगी पक्षाचे मराठवाडा प्रभारी व माजी मंत्री जयप्रकाश दांडेगावकर, आमदार शशिकांतजी शिंदे, माजी मंत्री विनायकराव पाटील, बस्वराज पाटील नागराळकर,माजी आ. सुधाकर भालेराव,माजी आ. चंद्रकांत दानवे,माजी आ. संजय वाघचौरे,मा.सोमेश्वर कदम,निळकंठ मिरकले, ॲड विनायक बाजपाई, महादेव आवाळे,निळकंठ होनराव,राजिव खंदाडे, संतोष भोसले यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.
