17.2 C
New York
Saturday, July 5, 2025

गावोगावी मंदिरात महापूजा; दोनशेहून अधिक महिला भजनी मंडळांस साडी चोळीचे वाटप आ. कराड यांचा जन्मदिवस साजरा

लातूर –  भारतीय जनता पार्टीचे नेते लातूर ग्रामीणचे आमदार  रमेशअप्पा कराड यांच्या जन्मदिवस ३० मे रोजी मोठ्या उत्साहाच्या वातावरणात साजरा करण्यात आला या निमित्ताने मतदार संघातील दोनशहून अधीक महीला भजनी मंडळांना साडी चोळीचे वाटप करण्यात आले रक्तदान शिबीर, शालेय साहित्याचे वाटप, वृक्षारोपण यासह विविध विधायक उपक्रम राबवण्यात आले अनेक गावातील ग्रामदेवतांची महापूजा करून रमेशअप्पांना दिर्घआयुष्य लाभावे यासाठी कार्यकर्त्याच्या वतीने प्रार्थना करण्यात आली लातूर येथील एमआयटी परिसरात मित्र मंडळाच्या वितीने आयोजीत करण्यात आलेल्या अभिष्टचिंतन सोहळ्यास उपस्थित राहून भाजपासह विविध राजकीय पक्षाचे लोकप्रतिनिधी, पदाधिकारी, कार्यकर्ते यांच्यासह हजारोजनांनी यथोचीत सत्कार करून तर अनेक मान्यवरांनी दुरध्वनीच्या माध्यमातून जन्मदिनाच्या निमित्ताने शुभेच्छा दिल्या. अभिष्टचिंतन सोहळयास ग्रामीण भागातील सर्वसामान्य नागरिकांनी प्रचंड गर्दी केली होती यात महिलांची उपस्थिती लक्षणीय होती.

आध्यात्मीक, सामाजिक शैक्षणिक कार्यासह, राजकारणात सतत अग्रेसर राहून आपल्या कामाचा वेगळा ठसा निर्माण करणारे, गोरगरीब व सर्वसामान्य जनतेच्या हितासाठी, शेतकरी शेतमजूराच्या न्यायहक्कासाठी सतत संघर्ष करणारे, गरजुंना वेळोवेळी मदत करणारे, कार्यकर्त्यांना बळ देवून मान आणि सन्मान मिळवून देणारे आणि सर्वांना आपलेसे वाटणारे भाजपाचे नेते आ. रमेशअप्पा कराड यांना लातूर ग्रामीण विधानसभा निवडणुकीत बहाद्दर मतदारांनी नवा इतिहास घडवून विधानसभेत पाठवले. लोकनियुक्त आमदार झाल्यानंतर शुक्रवार दि. ३० मे २०२५ रोजी पहिलाच हा जन्मदिवस आसल्याने कार्यकर्त्यांत आणि हितचिंतकात मोठा उत्साह दिसून आला. विविध विधायक कार्यक्रमाच्या माध्यमातून मोठ्या उत्साहाच्या वातावरणात साजरा करण्यात आला. आ. कराड मित्र मंडळाच्या वतीने अनेक ठिकाणी विविध विधायक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

आ. कराड मित्र परिवाराच्या वतीने लातूर येथील एमआयटी परिसरात आयोजीत अभिष्ठचिंतन सोहळयाला लातूर ग्रामीणसह जिल्हाभरातील भाजपा व विविध पक्षातील लोकप्रतिनिधी, पदाधिकारी आणि मित्रपरिवारांनी दिवसभरात आ. रमेशअप्पा कराड यांचा यथोचित सत्कार करुन, पुष्पगुच्छ देवून, मिठाई भरवून जन्मदिनाच्या शुभेच्छा दिल्या. अभिष्ठचिंतन करण्यासाठी दिवसभर मोठी गर्दी झाली होती. यात महिलांची संख्या लक्षणीय दिसून आली. तत्पूर्वी सकाळी असंख्य भाविकांचे श्रध्दास्थान असलेल्या रेणापूर येथील आदिशक्ती श्री रेणुका देवी मंदिरात आ. कराड यांनी महापूजा व आरती करून मनोभावे दर्शन घेतले. प्रारंभी छत्रपती शिवाजी महाराज चौक येथून मंदिारापर्यंत उघड्या जीप मधून वाजत गाजत फटाक्यांची आतिश बाजी करत अभिषेक अकनगिरे आणि रेणापूर भाजपाच्या वतीने भव्य मिरवणूक काढण्यात आली. यावेळी क्रेनच्या सहाय्याने भला मोठा पुष्पहार घालून स्वागत करण्यात आले. शैक्षणिक साहित्याची तुला करण्यात आली. मिरवणूकीत भाजपा कार्यकर्त्यांसह बाल टाळकरी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

आ. कराड मित्र मंडळाच्या वतीने लातूर ग्रामीण विधानसभा मतदार संघातील विविध गावातील दोनशेहून अधिक महिला भजनी मंडळांतील प्रत्येकी वीस याप्रमाणे तब्बल सव्वाचार हजार महिला भजनींना साडी चोळीचे वाटप करण्यात आले. त्याच बरोबर मंडल अध्यक्ष महेंद्र गोडभरले यांच्या वतीने तीन हजार शालेय विद्यार्थ्यांच्या स्कूलबॅग तसेच मंडल अध्यक्ष प्रताप पाटील यांच्या वतीने एक हजार शालेय विद्यार्थ्यांना पावसाळी छत्रीचे वाटपाचा शुभारंभ करण्यात आला. तर मंडल अध्यक्ष सुरज शिंदे यांच्या वतीने दहा फुट उंचीच्या विविध शंभर फळ झाडांच्या वृक्षारोपणाचा शुभारंभ करण्यात आला. मुरूड येथे कचरा कुंडयाचे वाटप करण्यात आले. आ. रमेशअप्पा कराड यांना दिर्घआयुष्य लाभावे यासाठी मतदार संघातील अनेक गावागावात भाजपाच्या कार्यकर्त्यांनी ग्रामदेवतांना अभिषेक, महापूजा व आरती करून प्रार्थना केली.

भाजपा नेते आ. रमेशअप्पा कराड यांनी जन्मदिनाच्या निमित्ताने भाजपाचे राष्ट्रीय सरचिटणीस तरुणजी चुघ, राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे, भाजपाचे प्रदेशाध्यक्ष तथा महसुल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, केंद्रिय सहकार राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, विधानपरिषद सभापती राम शिंदे, राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटील, जिल्ह्याचे पालकमंत्री शिवेंद्रसिह राजे भोसले, जलसंपदा मंत्री गिरीषजी महाजन, पर्यावरण मंत्री पंकजाताई मुंडे, मत्सव्यवसाय मंत्री नितेश राणे, नगरविकास राज्यमंत्री माधुरीताई मिसाळ, केंद्रिय माजी राज्यमंत्री रावसाहेब दानवे, विकास महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील, भाजपा प्रदेश मुख्य प्रवक्ता केशव उपाध्याय, माजी पालकमंत्री आ. संभाजीराव पाटील निलंगेकर, आ. विक्रम पाचपुरे, आ. चित्राताई वाघ, आ. सुरेश धस, आ. महेश लांडगे, आ. भिमराव तापकीर, आ. समाधान औताडे, आ. श्वेताताई महाले, आ. अभिमन्यू पवार, आ. संतोष दानवे, आ. धनंजय गाडगिळ, आ. रामदास तडस, आ. सचिन कल्याणशेट्टी, आ. शंकर जगताप, आ. विक्रांत पाटील, आ. अतुल भोसले, आ. सुरेश खाडे, आ. अमित गोरखे, आ. विनोद अग्रवाल, आ. राजकुमार बडोले, माजी खासदार डॉ. सुनिल गायकवाड, आ. सुभाष देशमुख, आ. संजय केनेकर, आ. प्रशांत ठाकूर, आ. सुलभा गायकवाड, आ. प्रविण दटके, आ. संदिप जोशी, आ. अमित साटम, आ. पराग शहा, आ. मनिषा चौधरी, शेखर मुंदडा, मोहन मते, डॉ. अर्चनाताई पाटील चाकूरकर, संग्राम देशमुख, संजय उपाध्याय यांच्यासह महाराष्ट्रातील अनेक मान्यवरांनी दुरध्वनी वरुन शुभेच्छा दिल्या. अभिष्टचिंतन कार्यक्रम प्रसंगी तुळशीराम आण्णा कराड, सौ. संजिवनीताई कराड, राजेश कराड, ऋषिकेश कराड, पृथ्वीराज कराड यांच्यासह कराड परावारातील अनेक सदस्य होते. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन चंद्रकांत कातळे यांनी केले.

अभिष्ठचिंतन सोहळ्यात आ. रमेशअप्पा कराड यांचा मित्रमंडळाचे अध्यक्ष प्रदिप पाटील खंडापूरकर, शिवसेना संपर्क प्रमुख अ‍ॅड. बळवंत जाधव, माजी आमदार सुधाकर भालेराव, माजी जि.प. अध्यक्ष राहुल केंद्रे, माजी महापौर चंद्रकांत बिराजदार, भाजपाचे दिलीपराव देशमुख, शैलेश लाहोटी, विक्रम काका शिंदे, अमोल पाटील, भागवत सोट, संजय दोरवे, नवनाथ भोसले, दादासाहेब करपे, रमाकांत बापू मुंडे, अनिल भिसे, जयंतराव काठवटे, बापूराव राठोड, शिवाजी केंद्रे, त्र्यंबक गुट्टे, रागिणी यादव, प्रेरणा होनराव, राजाभाऊ मदने, वैशाली लोंढे, श्वेता लोंढे, वसंतराव डिघोळे, अमोल निडवदे, बालाजी पाटील चाकूरकर, भारत चामे, उत्तरा कलबुर्गे, काकासाहेब शिंदे, संतोष बेंबडे, रोहिदास वाघमारे, विजयकुमार क्षिरसागर, पत्रकार रामेश्वर बद्दर, अरुण समुद्रे, शहाजी पवार, सतिष आंबेकर, महेंद्र गोडभरले, शरद दरेकर, प्रताप पाटील, सुरज शिंदे, उद्धव काळे, अभिषेक अकनगिरे, जगदिश कुलकर्णी, डॉ. बाबासाहेब घुले, हणमंतबापू नागटिळक, अ‍ॅड. मनोज कराड, वैभव सापसोड, वसंत करमुडे, विजय काळे, पद्माकर चिंचोलकर, बन्सी भिसे, राजकिरण साठे, आदिनाथ मुळे, अ‍ॅड. दशरथ सरवदे, गोविंद नरहरे, श्रीकृष्ण जाधव, विजय गंभिरे, अशोक सावंत, पांडुरंग बालवाड, बालाजी फड, सुरेश पाटील, महेंद्र जाधवर, दत्ता सरवदे, उज्वल कांबळे, विजय चव्हाण, सौ. लता भोसले, सौ. सुरेखा पुरी, अनुसया फड, सौ. जणाबाई साखरे, सौ. ललिता कांबळे, सौ. सत्यशिला आचार्य, शामसुंदर वाघमारे, ज्ञानोबा भिसे, विश्वास कावळे, काशिनाथ ढगे, लक्ष्मण यादव, भैरवनाथ पिसाळ, लक्ष्मण नागीमे, राजकुमार आलापुरे, अमर चव्हाण, संजय डोंगरे, संजय ठाकूर, भाऊसाहेब गुळभिले, माधव घुले, सुंदर घुले, गोपाळ शेंडगे, गणेश तुरुप, विजय मलवाडे, अभिनव वायबसे, राम बंडापल्ले, गोपाळ पाटील, उत्तम चव्हाण, अच्युत कातळे, संतोष राठोड, आप्पासाहेब पाटील, बालाजी गवळी, विनायक मगर, शंकर चव्हाण, हणमंत गव्हाणे, बाबासाहेब भिसे, संभाजी वायाळ, किशन क्षिरसागर, दिपक पवार, राज जाधव, मारुती गालफाडे, सुकेश भंडारे, बस्वराज रोडगे, श्रीकृष्ण पवार, रमाकांत फुलारी, चंद्रकांत वांगस्कर, धनंजय जाधव, अरविंद पारवे, ज्ञानेश्वर जुगल, महादेव साळुंके, अ‍ॅड. रुपेश थोरमोटे, ईश्वर बुलबुले, सचिन लटपटे, बाळासाहेब कदम, सुरेश सुर्यवंशी, विलास लोंढे, नितीन लोंढे, नरसिंग येलगटे, विनोद कदम, लक्ष्मण खलंग्रे, दिलीप पाटील, रविंद्र पाटील, सोमनाथ पावले, महादेव मुळे, सुखदेव बर्डे, लिंबराज सोमवंशी, पांडुरंग गडदे यांच्यासह लातूर ग्रामीण मतदार संघातील गावागावातील वाडीवस्तीतील भाजपा व इतर विविध पक्षातील लोकप्रतिनिधी पदाधिकारी व्यापारी, प्राध्यापक, सामाजिक कार्यकर्ते त्याचबरोबर लातूर एमआयटी वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. एन.पी. जमादार, उपअधिष्ठाता डॉ. बी.एस. नागोबा, शैक्षणिक संचालक डॉ. चंद्रकांत शिरोळे, रुग्णालय अधिक्षक डॉ. एकनाथ माले, नर्सिंग कॉलेजचे प्रा. एस.एस. सरावनन, सचिन मुंडे, मधुकर घुटे, श्रीपती मुंडे व इतर अधिकारी कर्मचारी आदींनी आ. रमेशअप्पा कराड यांना प्रत्यक्ष भेटून यथोचित सत्कार करुन शुभेच्छा दिल्या.  

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles