लातूर येथील नवीन शोरूम शुक्रवार, २६ डिसेंबर रोजी सकाळी ११ वाजता भव्य समारंभात सुरू होत आहे. शहरातील कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी, मेन रोड येथे उभारण्यात आलेल्या या शोरूमचे उद्घाटन प्रख्यात अभिनेत्री जेनेलिया डिसुझा यांच्या हस्ते होणार आहे. पश्चिम भारतातील प्रमुख बाजारपेठांमध्ये आपली भक्कम उपस्थिती निर्माण केलेल्या कल्याण ज्वेलर्सचे हे महाराष्ट्रातील २९ वे शोरूम ठरणार आहे. नवनवीन डिझाइन्स, आधुनिक मांडणी आणि जागतिक दर्जाची सेवा यामुळे लातूरकरांच्या दागिन्यांच्या खरेदीला नवी उंची मिळणार आहे.नवीन शोरूमच्या उद्घाटनाबाबत बोलताना कल्याण ज्वेलर्सचे कार्यकारी संचालक रमेश कल्याणरामन म्हणाले की, ग्राहकांच्या खरेदी अनुभवातील प्रत्येक पैलू अधिक समृद्ध करणारी सर्वसमावेशक प्रणाली उभारण्यावर कंपनीचा भर आहे. महाराष्ट्र ही आमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची बाजारपेठ असून, लातूरमधील हे शोरूम या प्रदेशाशी असलेल्या आमच्या बांधिलकीला अधिक बळ देणारे ठरेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
उद्घाटनानिमित्त खास ऑफर्सनवीन शोरूमच्या शुभारंभानिमित्त कल्याण ज्वेलर्सकडून आकर्षक ऑफर्स जाहीर करण्यात आल्या आहेत. निवडक दागिन्यांच्या मजुरीवर १५०० रुपयांपर्यंत सवलत देण्यात येणार असून, ग्राहकांना ‘कल्याण स्पेशल गोल्ड बोर्ड रेट’चा लाभ मिळणार आहे. हा दर बाजारपेठेतील सर्वात कमी दरांपैकी एक असून सर्व शोरूम्समध्ये एकसमान असतो. या ऑफर्स मर्यादित कालावधीसाठीच उपलब्ध राहणार आहेत. कल्याण ज्वेलर्समधील प्रत्येक दागिना बीआयएस हॉलमार्कसह उपलब्ध असून शुद्धतेच्या विविध कसोट्यांवर तपासलेला असतो. ग्राहकांना कंपनीचे सिग्नेचर चार-स्तरीय आश्वासन प्रमाणपत्र दिले जाते, ज्यामध्ये सोन्याची शुद्धता, दागिन्यांची आजीवन मोफत देखभाल, उत्पादनाची सविस्तर माहिती तसेच पारदर्शक एक्सचेंज आणि बाय-बॅक धोरणांचा समावेश आहे. या शोरूममध्ये कल्याण ज्वेलर्सचे लोकप्रिय हाऊस ब्रँड्ही उपलब्ध असतील. त्यामध्ये मुहूर्त, मुद्रा, निमा, ग्लो, झिया, अनोखी, अपूर्वा, अंतरा, हेरा, रंग तसेच अलीकडेच लाँच झालेले लीला या खास कलेक्शन्सचा समावेश असल्याचेही सांगण्यात आले. तर कल्याण ज्वेलर्सचे लातूरमधील हे नवे शोरूम ग्राहकांसाठी निश्चितच आकर्षण ठरणार आहे.

