उच्च क्षमतेचे सक्षन आणि जेटिंग मशीन मनपाच्या ताफ्यात दाखल

0
190

लातूर/प्रतिनिधी : शहरातील मलवाहिनी, भूमिगत गटार व मल संकलन केंद्रांची स्वच्छता आता अधिक सोप्या पद्धतीने होणार आहे. यासाठी उच्च क्षमतेचे सक्षन व जेटिंग मशीन लातूर महापालिकेच्या ताफ्यात दाखल झाले आहेत.यंत्र संचालक, नगरपरिषद प्रशासन संचालनालय, नवी मुंबई मार्फत अशी दोन आधुनिक वाहने लातूर मनपाला प्राप्त झाली आहेत. बुधवारी (दि. १०) पालिका आयुक्त तथा प्रशासक श्रीमती मानसी यांच्या हस्ते या वाहनांचे लोकार्पण करण्यात आले. यावेळी अतिरिक्त आयुक्त देविदास जाधव, उपायुक्त डॉ. पंजाब खानसोळे, मुख्य स्वच्छता अधिकारी कलीम शेख व स्वच्छता विभाग प्रमुख रमाकांत पिडगे उपस्थित होते.या नव्या यंत्रसामग्रीच्या माध्यमातून भूमिगत गटार, मलवाहिनी व मल संकलन केंद्रांची स्वच्छता अधिक प्रभावी व सुरक्षित पद्धतीने करता येणार आहे. ब्लॉक झालेल्या क्रॉसिंग पाईपची साफसफाई देखील यंत्राद्वारे सोपी होणार आहे. यामुळे स्वच्छता कर्मचाऱ्यांचे आरोग्य सुरक्षित राहून पाण्याचा पुनर्वापर करणे शक्य होणार आहे.नागरिकांच्या तक्रारींवर त्वरित कारवाई करण्यासाठीही या यंत्रांचा वापर करण्यात येणार आहे. आपत्कालीन स्थितीत मदतीसाठी नागरिकांनी मुख्य स्वच्छता अधिकारी कलीम शेख यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन मनपाच्या वतीने करण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here