लातूर : शिक्षक दिनाच्या निमित्ताने लातूर शहरातील ‘माझं घर’, बुधोडा येथे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने आदर्श शिक्षक पुरस्कार वितरण समारंभ उत्साहात पार पडला. या कार्यक्रमाचे वितरण राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या पदवीधर विभागाचे प्रदेशाध्यक्ष डॉ. नरेंद्र काळे यांच्या हस्ते करण्यात आले.
या वेळी शिक्षणासोबतच सामाजिक जाणीवा निर्माण करणारे आणि सामाजिक क्षेत्रात सक्रियपणे कार्यरत असणाऱ्या शिक्षक व प्राध्यापकांचा सन्मान करण्यात आला. सत्कारमूर्तींमध्ये प्रा. डॉ. सुभाष भिंगे, प्रा. डॉ. अशोक नारनवरे, प्रा. डॉ. अनिल जायभाय, मा. सुनिल हेंगणे, प्रा. शि. रुकसाना मुल्ला, सौ. संगीता झरे यांचा समावेश होता.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रा. माधव गंगापुरे होते. तसेच श्री. माधव बावगे, श्री. शाम जैन, डॉ. गणेश गोमारे, श्री. मनमन्थ कोनमारे, शरद झरे, राहुल कांबळे यांसारखे मान्यवर उपस्थित होते.
हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे युवक प्रदेश उपाध्यक्ष ॲड. निशांत वाघमारे, युवक प्रदेश सचिव श्री. चंद्रशेखर कत्ते, श्री. प्रमोद पाटील, लातूर विधानसभा अध्यक्ष ॲड. शेखर हविले, श्री. अमोल पाटील, ॲड. आशिष चव्हाण, डी. उमाकांत आणि इतर कार्यकर्त्यांनी विशेष परिश्रम घेतले.
या कार्यक्रमात शिक्षकांच्या योगदानाचा गौरव करण्यात आला असून समाजातील शैक्षणिक आणि सामाजिक विकासासाठी त्यांची भूमिका अधोरेखित करण्यात आली.




