अतिवृष्टीग्रस्त भागाचा दौरा; शेतकऱ्यांना दिलासा देण्याचे आश्वासन – आमदार रमेश आप्पा कराड

0
128

लातूर : लातूर ग्रामीण मतदारसंघातील शेतकरी बांधवांवर आलेल्या अतिवृष्टीच्या महासंकटाच्या पार्श्वभूमीवर आमदार रमेश आप्पा कराड यांनी आज नागझरी, जेवळी, टाकळी, काटगाव, काटगाव तांडा, तांदूळजा, कानडी बोरगाव, निळकंठ, भोसा, मसला, भिसे वाघोली, माटेफळ यांसह अनेक गावांचा सखोल पाहणी दौरा केला.

गेल्या काही दिवसांपासून झालेल्या मुसळधार पावसामुळे सोयाबीन, ऊस यांसारखी हाताशी आलेली खरिपाची पिके पूर्णपणे पाण्याखाली गेली आहेत. तर अनेक ठिकाणी मांजरा नदी व ओढ्यांना आलेल्या पुरामुळे शेतीची जमीन वाहून जाण्याबरोबरच शेतकऱ्यांच्या घरांची पडझड झाली आहे. शेतकऱ्यांशी थेट संवाद साधताना त्यांच्या अडीअडचणी व व्यथा ऐकून आमदार कराड यांनी त्यांना दिलासा दिला.

आमदार कराड म्हणाले, “महायुतीचे सरकार या संकटाच्या काळात प्रत्येक शेतकऱ्याच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे. नुकसानीचे पंचनामे जलद व अचूकपणे करण्याचे निर्देश संबंधित अधिकाऱ्यांना दिले आहेत. कोणताही शेतकरी मदतीपासून वंचित राहणार नाही, याची शासनस्तरावर काळजी घेतली जाईल.”

यावेळी तातडीने काही निर्णय घेतले गेले –

कानडी बोरगाव बॅरेजचे नादुरुस्त दरवाजे त्वरित दुरुस्त करून पाण्याचा निचरा करण्याचे आदेश.

भिसे वाघोली येथे रस्त्यालगतच्या धोकादायक विहिरीवर संरक्षण भिंत बांधण्याचे निर्देश.

निळकंठ येथील तात्पुरत्या पुलाची दुरुस्ती करून नवीन पुलाचा प्रस्ताव सादर करण्याचे आदेश.

आमदार कराड यांनी शेतकऱ्यांना धीर देत आश्वासन दिले

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here