लातूर : मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून वैद्यकीय मदत कक्षामार्फत चिंचोली ब येथील दिगंबर निवृत्ती भडांगे या रुग्णास मुख्यमंत्री सहाय्यता निधीमधून वैद्यकीय मदत कक्षमार्फत एक लाख रुपयेचा धनादेश शिवसेना जिल्हाप्रमुख शिवाजीराव माने यांच्या हस्ते रुग्णाच्या नातेवाईकास देण्यात आला.
11 जून रोजी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख शिवाजीराव माने यांच्या हस्ते चिंचोली ब तालुका औसा जिल्हा लातूर येथील रुग्ण दिगंबर निवृत्ती भडंगे हे मेंदूच्या आजाराने ग्रस्त होते त्यांच्या नातेवाईकांनी त्यांना डॉक्टर कवठाळे यांच्याकडे ऍडमिट केले तिथे दुरुस्त होणार नाहीत असे वाटल्यामुळे रुग्णाच्या सदरील रुग्ण सह्याद्री हॉस्पिटल लातूर डॉक्टर किनीकर यांच्याकडे दाखल केला परंतु सदरील रुग्णाच्या ऑपरेशनसाठी खर्च मोठ्या प्रमाणात होत असल्यामुळे सदरील खर्च करणे शक्य नव्हतं म्हणून रुग्णाच्या नातेवाईकाने शिवसेनेचे जिल्हाप्रमुख शिवाजी माने यांच्याशी संपर्क साधला माने साहेब यांनी वैद्यकीय मदत कक्षाचे प्रमुख सन्माननीय मंगेश चिवटे साहेब यांच्याशी संपर्क साधला आणि सदरील रुग्णाबाबत संपूर्ण माहिती दिली त्यानुसार सन्माननीय मंगेश चिवटे यांनी तात्काळ प्रस्ताव पाठवण्यासाठी सांगितले व मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी रीतसर मागणी हॉस्पिटलच्या सर्व बाबी पूर्ण करून मुख्यमंत्री सहाय्यता निधीचे प्रमुख सन्माननीय मंगेश चिवटे यांच्याकडे मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी वैद्यकीय मदत पक्षाचे सोमनाथ जाधव यांच्यामार्फत प्रस्ताव पाठवला सदरील प्रस्ताव शिवसेनेचे मुख्य नेते तथा महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय एकनाथ शिंदे साहेब यांच्याकडून तात्काळ मंजूर करण्यात आला व सह्याद्री हॉस्पिटलच्या नावाने एक लाख रुपयाचा धनादेश देण्यात आला. सदरील धनादेश आज रोजी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख शिवाजीराव माने यांच्या हस्ते शिवसेना जिल्हाप्रमुख यांच्या कार्यालयामध्ये रुग्णाच्या नातेवाईकास देण्यात आला यावेळी युवा सेना जिल्हाप्रमुख युवराज वंजारे विष्णू साबदे मागासवर्गीय सेनेचे श्रीमान सोमानी बालाप्रसाद महेश चांदणे सोशल मीडिया जिल्हाप्रमुख अजय गजाकोश महेश चांदणे सचिन पवार इत्यादी पदाधिकारी व रुग्णाचे नातेवाईक उपस्थित होते.
